टीम इंडियाच्या (Team India) खेळाडूंनी चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांना आजच्या होणाऱ्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची (Australia) मालिका जिंकल्यानंतर आफ्रिकेविरुद्धची सुद्धा मालिका जिंकली आहे. त्यातील उर्वरित सामना (Match) आज होणार आहे. त्यामुळे टीममधील काही महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. आता हे खेळाडू थेट विश्वचषकातील सामने खेळताना दिसतील.
केएल राहूल, विराट कोहली या जोडीला आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आज कोणाला संधी मिळणार हे पाहावं लागेल.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि आफ्रिकेच्या झालेल्या दोन सामन्यात अनेकांना संधी मिळाली नव्हती. त्यांना फलंदाजी करण्याची संधी मिळणार आहे. श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे.
आजची मॅच इंदौरमध्ये सायंकाळी सात वाजता सुरु होईल.
आशिया चषक स्पर्धेपासून विराट कोहलीची चांगली फलंदाजी सुरु झाली. त्याने आणि सुर्यकुमार यादवने आत्तापर्यंत मागच्या झालेल्या काही सामन्यात चांगली कामगिरी केली आहे.