IND vs AUS | विराटला ही कामगिरी करायला 10 वर्ष वाट पाहवी लागली, 2013 नंतर नेमकं झालं तरी काय?

| Updated on: Mar 11, 2023 | 5:43 PM

विराट कोहली आणि रन असं एक वेगळंच नातं आहे. पण गेल्या काही वर्षात विराट कोहलीला एका बॅड पॅचमधून जावं लागलं. इतकंच काय तर आतापर्यंत कसोटीत सूर गवसत नसल्याने हतबल दिसत होता.

IND vs AUS | विराटला ही कामगिरी करायला 10 वर्ष वाट पाहवी लागली, 2013 नंतर नेमकं झालं तरी काय?
IND vs AUS | दस साल बाद...! विराट कोहलीने अखेर करून दाखवलं, काय झालं नेमकं ते वाचा
Image Credit source: BCCI Twitter
Follow us on

मुंबई : विराट कोहलीला क्रिकेटविश्वात रनमशिन म्हणून ओळखलं जातं. आतापर्यंत त्याने आपल्या फलंदाजीने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मधला एक काळ त्याला वाईट गेला पण त्यानंतर त्याने जोरदार कमबॅक केलं.पण त्याला कसोटी सामन्यात काही केल्या सूर गवसत नव्हता. बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील तीन कसोटीत तर तो सपशेल अपयशी ठरला. त्यामुळे निवड समितीवर दबाव वाढत चालला होता. मात्र चौथ्या कसोटीत त्याला सूर गवसल्याचं दिसत आहे. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी करत त्याने दहा वर्षांचा दुष्काळ संपवला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने दहा वर्षानंतर अर्धशतक झळकावलं आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहली नाबाद 59 धावांवर खेळत होता.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीची आकडेवारी तशी पाहिली तर चांगली आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 शतकं केली आहेत. मात्र भारतात सलग दुसऱ्या मालिकेत फ्लॉप ठरला होत्या. 2017 मध्ये फक्त 46 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने शेवटचं अर्धशतकं 2013 मोहाली टेस्टमध्ये ठोकलं होतं. त्यानंतर आता मार्च 2023 मध्ये अर्धशतक झळकावण्यात यश आलं आहे.

मागच्या एका वर्षात विराट कोहलीने कसोटीत एकही अर्धशतक केलेलं नाही. त्याने शेवटचं अर्धशतक केपटाउन कसोटीत जानेवारी 2022 मध्ये केलं होतं. त्यात त्याने 79 धावांची खेळी केली होती.

ऑगस्ट सप्टेंबर 2021 मध्ये इंग्लंड दौऱ्यातून टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फेरी सुरु केली. मात्र तेव्हापासून आतापर्यंत काही खास करू शकला नाही. त्याचा सर्वात मोठा स्कोअर 79 आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिशनशिप 2021 ते 2023 दरम्यान 27 डावात 26.46 च्या सरासरीने 683 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसऱ्या दिवशीचा खेळ पाहता हा सामना ड्रॉच्या दिशेने आगेकूच करत असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या दिवस अखेर भारताने तीन गडी गमवून 289 धावा केल्या. अजूनही ऑस्ट्रेलियाकडे 191 धावांची आघाडी आहे. त्यामुळे चौथ्या दिवस भारतीय फलंदाजांनी तग धरला तर मात्र हा सामना अनिर्णित ठरेल. या मालिकेत भारताकडे 2-1 ने आघाडी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि उमेश यादव.

ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन | ट्रेव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, कॅमरन ग्रीन, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, नाथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुन्हेमन.