Odisha Train Accident : अपघात पाहून हादरला विराट कोहली, लिहीली इमोशनल पोस्ट

| Updated on: Jun 03, 2023 | 3:51 PM

विराट कोहली सध्या इंग्लंडमध्ये आहे. त्याचे संपूर्ण लक्ष वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलकडे होते, पण ओडिशातील रेल्वे अपघाताची बातमी ऐकून तो अस्वस्थ झाला.

Odisha Train Accident : अपघात पाहून हादरला विराट कोहली, लिहीली इमोशनल पोस्ट
Image Credit source: BCCI
Follow us on

नवी दिल्ली : ओडिशामध्ये काल संध्याकाळी ७ च्या सुमारास झालेल्या रेल्वे अपघाताने (train accidet) संपूर्ण देश हादरला आहे. या अपघाताने शेकडो कुटुंबांना एका झटक्यात आयुष्यभर वेदना दिल्या. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अपघाताचे व्हिडिओ हृदय हेलावून टाकणारे आहेत. या अपघातात आतापर्यंत 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 900 हून अधिक गंभीर जखमी आहेत. ही घटना ऐकून क्रिकेटपटू विराट कोहलीही (Virat Kohli) आतून हादरला.

कोहली सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी इंग्लंडमध्ये आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा आयपीएलमधील प्रवास लीग टप्प्यात संपल्यानंतर तो इंग्लंडला रवाना झाला, जिथे कोहली अंतिम सामन्याच्या तयारीत व्यस्त आहे. 7 ते 11 जून दरम्यान ओव्हल येथे अंतिम सामना खेळवला जाईल. त्याचं पूर्ण लक्ष फक्त या फायनलवर होतं, पण त्याच दरम्यान भारतातील या मोठ्या रेल्वे अपघाताची बातमी ऐकून त्याला वेदनाही झाल्या आहेत.

कोहलीने व्यक्त केले दु:ख

कोहलीने शनिवारी ट्विट करत या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केले. शातील वेदनादायक रेल्वे अपघाताबद्दल ऐकून वाईट वाटले. या अपघातात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, माझ्या प्रार्थना त्या कुटुंबांसोबत आहेत, असे कोहली म्हणाला. अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, अशी प्रार्थनाही कोहलीने केली.

 

संपूर्ण देश सोबत उभा आहे

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही ट्विट केले आहे की, या अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना देव शक्ती देवो. जखमींना लवकरात लवकर बरे वाटावे, अशी प्रार्थना करत, संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी उभा असल्याचे त्याने नमूद केले.

 

हरभजन सिंगने ट्विट केले की, ओडिशा ट्रेन दुर्घटनेबद्दल जाणून घेणे खूप वेदनादायक आहे. त्यांनी रेल्वे मंत्रालयाला लवकरात लवकर प्रवाशांना वाचवण्याचे आवाहन केले आहे.