टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचे (Anushka Sharma) अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहेत. त्यामुळे दोघांची चर्चा सुद्धा सोशल मीडियावर अधिक असते. कारण त्यांनी चाहत्यांना आवडतील असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. विराट कोहलीच्या नव्या हेअर स्टाईलची चर्चा पुन्हा जोर धरु लागली आहे. कारण काल सुटा बुटात ऑस्ट्रेलियात दिसला होता. तिथले फोटो सुद्धा सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत.
विराटने आत्तापर्यंत स्वत:चा चांगला असा फिटनेस सुद्धा ठेवला आहे. तसेच तो खेळताना कधी थकल्याचं पाहायला मिळालेलं नाही. आयपीएलमध्ये सुद्धा खेळताना त्याचा फिटनेस पाहायला मिळाला आहे.
विराट कोहलीच्या नावावर आत्तापर्यंत अनेक रेकॉर्ड झाले आहेत. काही दिवसांपुर्वी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वर्षांनी शतक झळकावलं आहे. काही दिवसांनी तो सचिन तेंडूलकरचा सुद्धा रेकॉर्ड तोडेल असा चाहत्यांना विश्वास आहे.
विराट कोहली कायम दिल्लीच्या छोले-भटुरेचा व्हिडीओ पाहायचा, तसे छोले-भटुरे मुंबईत कुठे मिळत आहेत का ? याचा अनुष्का शर्माने शोध घेतला आहे. मुंबईतील चेंबूरच्या एका हॉटेलमध्ये छोले-भटुरे मिळाल्याने अनुष्का एकदम खूश झाली आहे.