मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय असतो. सोशल मीडियावर विराट कोहलीने एखादी गोष्ट शेअर केली की, त्याची चाहत्यांमध्ये चर्चा सुरु होते. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांनी जुहू बीज किनारी एक छोटसं घर भाड्याने घेतलं आहे, सध्या त्याच्या भाड्याची आणि डिपॉझिटची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
— Virat Kohli (@imVkohli) November 22, 2022
विराट कोहलीने त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये त्याने कलरफुल टी-शर्ट घातला आहे. त्याच्या टी-शर्टची कालपासून चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीला महागड्या वस्तू खरेदी करण्याचा आवड आहे. कालच्या टी-शर्टची किंमत किती असेल यावर चर्चा सुरु आहे.
Sweatshirt ki link chikoo bhai ✊?
— Amrendra (@aisawaisaladka) November 22, 2022
मंगळवारी ज्यावेळी कोहलीच्या चाहत्यांनी विराटचा Hand-Knitted टी-शर्ट पाहिला त्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. टी-शर्ट कोणत्या कंपनीचा आहे. त्याची किंमत किती असेल अशी चर्चा होती.
विशेष म्हणजे तो टी-शर्ट साधारण दहा हजार रुपयांचा आहे. त्यावर ईएमआयची व्यवस्था आहे. सोशल मीडियावर विराटला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले आहेत. विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला न्यूझिलंड दौऱ्यात आराम दिला आहे.
— Nikhil thakur?? (@Nikhil__thakur2) November 22, 2022