मेलबर्न : कालच्या सामन्यात टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानला (Pakistan) हरवल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) टीम इंडियाच्या चाहत्यांनी अनेक मीम्स व्हायरल करुन गोंधळ घातला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या चाहत्यांनी खेळाडूंच्या कामगिरीवरती जोरदार टीका केली आहे. कारण काल झालेल्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंनी मॅचमध्ये अधिक चुका केल्या आहेत. पाकिस्तानचे खेळाडू अधिक गोंधळल्याचे पाहून चाहते खूश झाले आहेत.
कालच्या सामन्यात विराट कोहली आणि हार्दीक पांड्याने चांगली कामगिरी केली. त्यामुळे टीम इंडियाने एकहाती विजय मिळविला. विशेष म्हणजे कालच्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी केली आहे.
विराट कोहलीने षटकार मारलेला चेंडू नो बॉल दिला होता. त्यानंतर पुढच्या चेंडूवर विराटचा बोल्ड झाला. परंतु फ्री हीट चेंडू असल्याने दिनेश कार्तिक आणि विराट कोहलीने तीन धावा पळून काढल्या. त्यानंतर पाकिस्तानचे खेळाडू आणि त्यांचा कर्णधार बाबर आझमचा गोंधळ पाहायला मिळाला.
बाबर आझम गोंधळल्याचे काही मीम्स व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंनी डेड बॉलची मागणी केली होती. परंतु अंपायरने तीन धावा दिल्याने पाकिस्तानचे खेळाडू नाराज झाले.