दिवसाचा खेळ संपण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. विराट कोहली (Virat Kohli) अवघ्या 20 धावा करून बाद (Out) झाला आणि पुन्हा एकदा मोठी धावसंख्या (Runs) उभारण्यात अपयशी ठरला. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याचा चेंडू विराटच्या बॅटच्या काठावर आदळला आणि यष्टिरक्षक सॅम बिलिंग्सच्या ग्लोव्हजला लागून चेंडू जो रूटच्या हातापर्यंत गेला. या पाचव्या कसोटीवर भारतीय संघाने आपली पकड मजबूत केली आहे. खेळाच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडचा पहिला डाव 284 धावांत गुंडाळला. इंग्लंडकडून जॉनी बेअरस्टोने 106 आणि सॅम बिलिंग्सने 36 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराजने चार आणि जसप्रीत बुमराहने तीन खेळाडूंना बाद केले.
भारताचा पहिला डाव 416 धावांवर आटोपला. ऋषभ पंतने 146 आणि रवींद्र जडेजाने 104 धावा केल्या. बुमराहने 16 चेंडूत नाबाद 31 धावांची विक्रमी खेळीही खेळली. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 100 धावांचा टप्पा ओलांडला. सुरुवातीच्या तीन धक्क्यांनंतर टीम इंडियाची धावसंख्या पुढे नेण्याची जबाबदारी चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या खांद्यावर आली. भारताची आघाडी 235 धावांवर पोहोचली आहे. अशा स्थितीत शक्य तितकी कामगिरी करावी हे टीम इंडियाचे लक्ष्य असेल.
इंग्लंडच्या डावात भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात मैदानावरच वादावादी झाली होती. विराट कोहलीने काय करायचे ते मला सांगू नकोस, तोंड बंद करून बॅट कर, असे बेअरस्टोला म्हणाला. यानंतर पंचांना हस्तक्षेप करुन वाद मिटवला. त्यानंतर ब्रेकमध्ये दोघेही एकमेकांशी हसत गप्पा मारताना दिसले. मोहम्मद शमी गोलंदाजी करत असताना विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात काही संवाद झाला. जॉनी बेअरस्टोकडून एक बॉल बीट झाला होता, त्यानंतर स्लिपमध्ये उभा असलेला विराट कोहली काहीतरी म्हणाला. यावर जॉनी बेअरस्टो संतापला आणि विराटवर ओरडू लागला. यानंतर दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (Virat Kohli was out with 20 runs in the second innings)