एडिलेड : टीम इंडियाचा (Team India) महत्त्वाचा खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आशिया चषकापासून (Asia Cup) चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आशिया चषकात विराट कोहलीने (Virat Kohli) सर्वाधिक धावा केल्या. त्यानंतर विराटने ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेच्या मालिकेत सुद्धा चांगली खेळी केली. T20 विश्वचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून विराट कोहली चांगली फलंदाजी करीत आहे. झालेल्या अनेक सामन्यात त्याने महत्त्वपुर्ण खेळी केली आहे. आज विराट कोहली स्वत:चं रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे.
विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत झालेल्या पाच मॅच पैकी तीन मॅचमध्ये अर्धशतकी पारी खेळली आहे. त्यामुळे त्याची वैयक्तिक धावसंख्या 246 झाली आहे. आतापर्यंत विराटच्या नावावर सगळ्यात जास्त धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. 2014 मध्ये विराटने 319 धावा केल्या होत्या. सध्या विराट कोहली त्याच्या पहिल्या रेकॉर्डपासून थोडासा दूर आहे.
आजच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध विराट कोहलीने चांगली फलंदाजी केली. तर तो त्याचा पहिला रेकॉर्ड तो तोडू शकेल. आजची मॅच दीड वाजता सुरु होणार आहे. सगळ्या चाहत्याचं लक्ष मॅचकडे लागलं आहे.
विश्वचषक स्पर्धेत अधिक धावा करणाऱ्या यादीत सुर्यकुमार यादवचा सुद्धा समावेश आहे. त्याने सुद्धा 225 धावा केल्या आहे. आज सुर्यकुमार यादव रोखणे इंग्लंड टीमसाठी मोठं आव्हान असेल. कारण सुर्यकुमार यादवने चांगल्या गोलंदाजांची विश्वचषक स्पर्धेत धुलाई केली आहे.
टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, आर पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
इंग्लंड टीम
जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, अॅलेक्स हेल्स, हॅरी ब्रुक, सॅम कुरन, ख्रिस जॉर्डन, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल रशीद, फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, रीस टोपली, डेव्हिड विली, ख्रिस वोक्स, मार्क वुड.