विराट कोहली लवकरच शतकांचा दुष्काळ दूर करेल, पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी

| Updated on: May 01, 2021 | 3:18 PM

गेली दीड वर्ष विराटच्या बॅटमधून शतक निघालेलं नाहीय. मात्र विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, लवकरच त्याच्या बॅटमधून नेहमीसारखी आतिषी खेळी पाहायला मिळेल ज्याद्वारे तो आपलं 71 वं शतक साजरं करेल, असं मोहम्मद युसुफने म्हटलं आहे. (Virat Kohli Will Hit Internation Hundred Soon Says pakistan Player Mohammad Yousuf)

विराट कोहली लवकरच शतकांचा दुष्काळ दूर करेल, पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूची भविष्यवाणी
विराट कोहली
Follow us on

मुंबई : भारताचा आक्रमक फलंदाज ज्याने जागतिक क्रिकेटवर राज्य केलंय तो विराट कोहली (Virat Kohli) लवकरच शतकांचा दुष्काळ दूर करेल,  अशी भविष्यवाणी पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूची केली आहे. पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू मोहम्मह युसुफने (Mohammad Yousuf) ही भविष्यवाणी केलीय. गेली दीड वर्ष विराटच्या बॅटमधून शतक निघालेलं नाहीय. मात्र विराट सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, लवकरच त्याच्या बॅटमधून नेहमीसारखी आतिषी खेळी पाहायला मिळेल ज्याद्वारे तो आपलं 71 वं शतक साजरं करेल, असं मोहम्मद युसुफने म्हटलं आहे.  (Virat Kohli Will Hit Internation Hundred Soon Says pakistan Player Mohammad Yousuf)

विराटचं शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक कधी…?

विराट कोहलीने वेस्टइंडिजविरुद्ध 2019 साली शेवटचं शतक ठोकलं होतं. पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) येथे खेळताना 14 ऑगस्ट 2019 ला विराटने नाबाद 114 धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर विराटच्या बॅटमधून जवळपास दीड वर्षांहून अधिक काळापासून शतकं आलेलं नाहीय.

पाकिस्तानी दिग्गज मोहम्मद युसुफची भविष्यवाणी काय…?

जवळपास गेली दीड वर्ष विराट कोहलीच्या बॅटमधून शतक निघालेलं नाहीय. मात्र सध्या विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. लवकरच त्याच्या बॅटचा सलवा तो दाखवले आणि शतकांचा दुष्काळ दूर कले. विराट पुन्हा एकदा शतकांचा रतीब घालायला सुरुवात करेन, अशी भविष्यवाणी मोहम्मद युसुफने केली आहे.

कोहलीच्या नावावर मोठमोठे रेकॉर्ड्स

विराट कोहली केवळ 32 वर्षांचा आहे. या वयात बॅट्समनचा चांगला फॉर्म असतो. त्याच्या नावावर याआधीही खूप रेकॉर्ड्स आहेत. तो लवकरच पुन्हा शतकं ठोकायला सुरु करेल. त्याने टेस्ट आणि वनडेमध्ये 70 शतकं झळकावली आहेत. सचिनच्या 100 शतकांना गाठायला आता केवळ 30 शतकं बाकी आहेत.

विराट-सचिनची तुलना मला आवडत नाही

विराट-सचिनची तुलना मोहम्मद युसुफला पसंत नाहीय. तो म्हणाला, “मी त्यांच्यातल्या तुलनेचं समर्थन करत नाही किंबहुना मला ती आवडत नाही. कारण सचिन आणि विराटच्या क्रिकेट खेळण्याचा काळ वेगळा आहे. सचिन ज्या काळात क्रिकेट खेळला त्या काळातल्या गोलंदाजांचा नुसता विचार जरी केला तरी अवघडल्यासारखं होतं. विराटने ज्या खेळी खेळल्या आहेत, त्याची कितीही तारीफ केली तरी ती कमी आहे.”

(Virat Kohli Will Hit Internation Hundred Soon Says pakistan Player Mohammad Yousuf)

हे ही वाचा :

IPL 2021 CSK vs MI Live Streaming : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स, सामना कधी, कुठे, केव्हा?

IPL 2021 : कोरोनाचा हाहाकार, ऑस्ट्रेलियाची सावध पावलं, IPL संपल्यानंतर मायदेशी कसा जाणार?, मॅक्सवेलने सांगितला प्लॅन

IPL 2021 : ‘शाब्बास रं वाघा’, बंगळुरुचं कंबरडं मोडणाऱ्या हरप्रीतच्या पाठीवर विराटची कौतुकाची थाप!