दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल अर्थात आयसीसीने (ICC) दशकातील सर्वश्रेष्ठ पुरस्कारांची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) दशकातील सर्वश्रेष्ठ पुरुष खेळाडू हा (ICC Male Cricketer of the Decade) पुरस्कार जाहीर झाला आहे. आयसीसीने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. ( Virat Kohli wins the Sir Garfield Sobers Award for ICC Male Cricketer of the Decade)
The incredible Virat Kohli wins the Sir Garfield Sobers Award for ICC Male Cricketer of the Decade ?
? Most runs in the #ICCAwards period: 20,396
? Most hundreds: 66
? Most fifties: 94
?️ Highest average among players with 70+ innings: 56.97
? 2011 @cricketworldcup champion pic.twitter.com/lw0wTNlzGi— ICC (@ICC) December 28, 2020
आयसीसीने 24 नोव्हेंबरला या दशकात दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना विविध पुरस्कारांसाठी नामांकित करण्यात आले होते. यामध्ये विराट कोहलीला सर्वाधिक 5 पुरस्कारांसाठी नामांकन देण्यात आलं होतं.
The incredible Virat Kohli wins the Sir Garfield Sobers Award for ICC Male Cricketer of the Decade ?
? Most runs in the #ICCAwards period: 20,396
? Most hundreds: 66
? Most fifties: 94
?️ Highest average among players with 70+ innings: 56.97
? 2011 @cricketworldcup champion pic.twitter.com/lw0wTNlzGi— ICC (@ICC) December 28, 2020
खेळाडूची पुरस्कारासाठी ऑनलाईन पद्धतीने निवड करण्यात आली आहे. आयसीसीने ट्विटरवर गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन व्होटिंग पद्धत सुरु केली होती. या ऑनलाईन पद्धतीने नामांकन मिळालेल्या आपल्या आवडत्या खेळाडूला मतप्रक्रिया सुरु ठेवली होती. या प्रक्रियेद्वारे पुरस्कारांसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.
“हा पुरस्कार मिळाल्याने मी फार आनंदी आहे. आपल्या संघाला विजय मिळवून द्यावा, इतकीच माझी इच्छा असते. माझ्यात संघाला विजय मिळवून देण्याची तीव्र इच्छाशक्ती आहे. तसेच टीम इंडियासाठी प्रत्येक सामना जिंकावा असं मला वाटतं. माझे विक्रम हे टीम इंडियाच्या विजयाचे प्रतिक आहेत”, अशी प्रतिक्रिया विराटने हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर दिली.
दरम्यान आयसीसीने रविवारी 27 डिसेंबरला दशकातील तिन्ही प्रकारातील सर्वश्रेष्ठ संघाची घोषणा केली. या कसोटी, एकदिवसीय आणि टी 20 अशा तिन्ही संघात विराट कोहलीला संधी देण्यात आली आहे. विराट तिन्ही टीममध्ये स्थान मिळवणारा एकमेव खेळाडू ठरला आहे.
विराट सध्या पालकत्वाच्या रजेसाठी भारतात आहे. विराटच्या घरी लवकरच नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. यामुळे विराट ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीनंतर भारतात परतला आहे.
संबंधित बातम्या :
(Virat Kohli wins the Sir Garfield Sobers Award for ICC Male Cricketer of the Decade)