Ind Vs Aus 2020 : तिसऱ्या टी-ट्वेन्टीत भारताची धीम्या गतीने बोलिंग, मॅच रेफ्रीने ठोठावला दंड

| Updated on: Dec 09, 2020 | 3:55 PM

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने धीम्या गतीने बोलिंग केल्याने आयसीसीने भारतीय संघाला 20 टक्के दंड ठोठावला.

Ind Vs Aus 2020  : तिसऱ्या टी-ट्वेन्टीत भारताची धीम्या गतीने बोलिंग, मॅच रेफ्रीने ठोठावला दंड
Follow us on

सिडनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान (Ind Vs Aus) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या टी-ट्वेन्टी सामन्यात भारताने धीम्या गतीने बोलिंग केल्याने आयसीसीने भारतीय संघाला 20 टक्के दंड ठोठावला. आयसीसी मॅच रेफ्री डेव्हिड बून यांनी हा दंड ठोठावला. भारतीय संघाने मंगळवारी सिडनीत खेळलेल्या मॅचमध्ये निर्धारित वेळेत ओव्हर टाकल्या नाहीत. यामुळे भारतीय संघाला मॅच मानधनाच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला.  (Virat kolhi And Co Fined twenty percent of match fee for maintaining Slow Over Rate india Vs Aus 3rd T20)

निर्धारित वेळेत निर्धारित ओव्हर टाकल्या जाव्यात, असा आयसीसीचा नियम आहे. परंतु भारतीय संघाने तिसऱ्या टी ट्वेन्टीत जराशी धीम्या गतीने गोलंदाजी केली. निर्धारित वेळेमध्ये भारताने 19 ओव्हर टाकल्या होत्या. म्हणजेच निर्धारित वेळेत ओव्हर टाकण्यात भारतीय संघ 1 ओव्हर मागे होता.

आयसीसी खेळाडू आणि स्टाफसाठी आचारसंहिता कलम 2.22 नुसार निर्धारित वेळेत जर ओव्हर पूर्ण केल्या नाहीत तर प्रत्येक ओव्हरला मॅच फीसच्या 20 टक्के दंड भरावा लागतो. भारतीय संघाने निर्धारित वेळेत 19 ओव्हर पूर्ण केली. 1 ओव्हर बाकी असल्याने तेवढ्याच 1 ओव्हरसाठी मॅच फीसच्या 20 टक्के दंड ठोठावण्यात आला. कर्णधार विराट कोहलीने देखील आपली चूक कबूल केली आहे.

मॅचचे अम्पायर रॉड टकर, गेरार्ड अबूड, टीव्ही अम्पायर पॉल विल्सन आणि चौथे अम्पायर सॅम नोगास्की यांनी याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार भारतीय संघावर कारवाई केली गेली आहे. याअगोदर ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पहिल्याच वनडे मॅचमध्ये भारतीय संघाला धीम्या गतीने ओव्हर टाकल्याने दंड भरावा लागला होता.

तीन सामन्यांच्या टी ट्वेन्टी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियन संघाला 2-1 असं नमवलं. पहिल्या दोन्ही टी- ट्वेन्टी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाची चव चाखायला लावली. त्यानंतर तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने मात्र विजय मिळवत भारताचं क्लिन स्विपचं स्वप्न साकार होऊ दिलं नाही.

(Virat kolhi And Co Fined twenty percent of match fee for maintaining Slow Over Rate india Vs Aus 3rd T20)

संबंधित बातम्या

Ind Vs Aus : भारताविरुद्ध डे नाईट प्रॅक्टिस मॅचसाठी ऑस्ट्रेलिया A टीम घोषित, पाहा कोणाकोणाचा समावेश?

India vs Australia 2020 3rd T20 Live Updates : अखेरचा टी-ट्वेन्टी सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचा शेवट गोड, भारताचा 12 रन्सने पराभव