सिडनी : क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि केएल राहुलने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी विराटने हार्दिकच्या वक्तव्यांचं समर्थन केलं नाही, पण त्याची टीमसाठी जी भावना आहे ती बदलणार नसल्याचंही विराटने स्पष्ट केलं.
या वादामुळे हार्दिक पंड्या आणि केएल राहुलवर दोन सामन्यांची बंदी घालण्यात यावी, अशी शिफारस क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय केली आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप यावर कुठलाही निर्णय दिलेला नाही.
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या तीन वन डे सांमन्यांची मालिका उद्या म्हणजेच शनिवारपासून सुरु होत आहे. भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसोटी सामना जिंकून इतिहास रचला. त्यानंतर आता या दोन्ही देशांमध्ये वन डे सामने रंगणार आहेत. त्यासंदर्भात कर्णधार विराट कोहलीने सिडनी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यादरम्यान त्याने वादाच्या भोवऱ्यात असेलेल्या हार्दिक पंड्या आणि केएल राहुलबाबतही प्रतिक्रिया दिली.
“आम्ही भारतीय क्रिकेट टीमच्या दृष्टीने आणि जबाबदार खेळाडूच्या नात्याने त्यांच्या विचारांशी सहमत नाही. ते त्यांचे व्यक्तीगत विचार होते. आम्ही सध्या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत”, असे विराट म्हणाला.
Virat Kohli on KL Rahul & Hardik Pandya, in Australia: We as the Indian cricket team and responsible cricketers don’t align with those views, those were individual opinions. We are still waiting for a decision to be made. pic.twitter.com/ECSnmyOegC
— ANI (@ANI) January 11, 2019
“या वादामुळे आमच्या ड्रेसिंग रुमच्या वातावरणात कुठलाही बदल होणार नाही. याने आमचं मनोबल तुटू शकत नाही. एकदा निर्णय आला, की आम्ही कॉम्बिनेशनवर विचार करु”, असेही विराटने स्पष्ट केले.
Virat Kohli on KL Rahul & Hardik Pandya: From the Indian cricket team’s point of view, this changes nothing in our beliefs in the change room, it does nothing to the spirit we have have been able to create. Combinations will have to be thought of once the decision comes out. pic.twitter.com/TDL3FNA4Ta
— ANI (@ANI) January 11, 2019
सामन्यात कुठले 11 खेळाडू खेळतील याची घोषणा सामन्याच्या एक दिवसाआधी केली जाते. मात्र सध्या हार्दिक पंड्या आणि केएल राहुलच्या त्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांच्यावर कुठली बंदी घालायची याचा निर्णय बीसीसीआयला द्यायचा आहे. विराटला याच निर्णयाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अद्यापही टीमची घोषणा करण्यात आलेली नाही.
सिडनी एक दिवसीय सामन्यांच्या तयारीबाबत विराटने सांगितले की, ‘सध्या आम्ही विश्वचषक सामन्यांच्या तयारीत आहोत’. याच वर्षी 30 मेपासून आयसीसी वन डे विश्वचषकाची सुरुवात होणार आहे.
Indian Captain Virat Kohli in Australia: Our immediate focus is to prepare for the World Cup. We understand where we need to head as a team. #INDvAUS pic.twitter.com/yYt7epD22C
— ANI (@ANI) January 11, 2019