World Cup 2023 आधी वीरेंद्र सेहवागची रोहित शर्माबाबत मोठी भविष्यवाणी, स्पष्टच म्हणाला…

| Updated on: Aug 26, 2023 | 2:13 PM

Virender Sehwag on Rohit Sharma : टीम मॅनेजमेंटलाही निवड करताना कोणाला डावलायचं आणि कोणाला संधी द्यायची हे ठरवणं कठीणच असणार आहे. अशातच टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने कर्णधार रोहित शर्माबाबत मोठी भविष्यवाणी केलीये. 

World Cup 2023 आधी वीरेंद्र सेहवागची रोहित शर्माबाबत मोठी भविष्यवाणी, स्पष्टच म्हणाला...
Follow us on

मुंबई : वनडे वर्ल्ड कप 2023 च्या पार्श्वभूमीवर टीम इंडियामध्ये बदल केलेले पाहायला मिळले. टीम मॅनेजमेंट चौथ्या नंबरसाठी अजूनही एका खंद्या खेळाडूच्या शोधात आहे. कारण मागील वर्ल्ड कपमध्ये मधली फळी पूर्णपणे उघडी पडलेली दिसून आलं. त्यावेळी ऋषभ पंतला संधी देण्यात आली होती मात्र त्यालाही काही संधीचं सोनं करता आलं नाही. वर्ल्ड कपसाठी संघात जागा मिळवणं प्रत्येक खेळाडूसाठी मोठी कसोटी असणार आहे. टीम मॅनेजमेंटलाही निवड करताना कोणाला डावलायचं आणि कोणाला संधी द्यायची हे ठरवणं कठीणच असणार आहे. अशातच टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग याने कर्णधार रोहित शर्माबाबत मोठी भविष्यवाणी केलीये.

काय म्हणाला वीरेंद्र सेहवाग?

या वर्ल्ड कपमध्ये ओपनर सर्वाधिक धावा करतील. ओपनिंगला आलेल्या खेळाडूला पिचवर जास्त वेळ थांबता येईल आणि एकदा सेट झाल्यावर फटकेबाजी करेल. ओपनरमधील सर्वाधिक धावा करणारा करणारा खेळाडूंमध्ये इतरही नावं आहेत पण मी रोहित शर्माचं नाव घेईल. वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा वेगळ्याच एनर्जीने खेळतो आणि आता तर तो संघाचा कर्णधार असल्याने सर्वाधिक धावा करेल, अशी भविष्यवाणी वीरेंद्र सेहवाग याने केली आहे.

आयसीसीने वीरेंद्र सेहवागचा हा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.  5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कप 2023 च्या थराराला सुरूवात होणार असून टीम इंडियाचा पहिला सामना 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध असणार आहे.

दरम्यान, यंदाचा वर्ल्ड कप भारतामध्ये असल्याने टीम इंडियाला प्रबळ दावेदार मानलं जात आहे.  टीम इंडियाला घरच्या मैदानावर पराभूत करणं अवघड असणार आहे. मात्र इतर सर्व संघ जोरदार तयारीला लागले असून आयपीएल खेळणाऱ्या खेळाडूंना भारतामधील वाातावरणाशी जुळवून घ्यायला जास्त त्रास होणार नाही.