रायपूर : आंतरराष्ट्रीय आणि आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतरच्या अनेक वर्षांनतरही वीरेंद्र सेहवागचा (Virendra Sehwag) जलवा कायम आहे. सेहवागने आपल्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. सध्या भारतात इंडिया रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज टी 20 स्पर्धा (Road Safety World T20 Series) सुरु आहे. या स्पर्धेत 5 मार्चला बांगलादेश लिजेंड्स (Bangladesh Legends) विरुद्ध इंडिया लिजेंड्स India Legends यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात इंडियाने बांगलादेशवर 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या सामन्यात सेहवागने विजयी खेळी साकारली. सेहवागने एकूण 35 चेंडूत 80 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने 10 चौकार आणि 5 षटकार लगावले. म्हणजेच सेहवागने 15 चेंडूत 70 धावा चोपल्या. (virender sehwag scored 80 runs against Bangladesh Legends in Road Safety World T20 Series)
बांगलादेशने प्रथम टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. बांगलादेशला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आले नाही. इंडियाच्या गोलंदाजांसमोर बांगलादेशचा डाव 109 धावांवर 19.4 ओव्हर्स आटोपला. विनय कुमार, प्रज्ञान ओझा आणि युवराज सिंह या तिकडीने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. मनप्रीत गोनी आणि युसूफ पठाणने प्रत्येकी 1 बळी घेतली. त्यामुळे इंडियाला विजयासाठी 20 षटकांमध्ये 110 धावांचे माफक आव्हान मिळाले.
विजयी आव्हानाचं पाठलाग करायला सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग मोठी आणि अनुभवी जोडी मैदानात आली. वीरेंद्र सेहवागने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळीला सुरुवात केली. सेहवागने बांगलादेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सेहवागने गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. सेहवागने अवघ्या 20 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं.
Sehwag bringing up fifty with a Six remains constant.❤#RoadSafetyWorldSeries2021 #IndiaLegends pic.twitter.com/GC8d71NJfq
— UrMiL07™ (@urmilpatel30) March 5, 2021
विशेष म्हणजे त्याने सिक्स खेचत हे अर्धशतक झळकावलं. तर सोबत असलेल्या सचिनने सेहवागला चांगली साथ दिली. सचिनने सेहवागला स्ट्राईकवर खेळण्याची संधी दिली.
Back to winning ways! #IndiaLegends win the opening game of the @Unacademy Road Safety World Series. #YehJungHaiLegendary
Shoutout to #BangladeshLegends for a stellar fight! pic.twitter.com/D9PUAzbGpA
— Road Safety World Series (@RSWorldSeries) March 5, 2021
सेहवाग अर्धशतकानंतर आणखी आक्रमक झालेला दिसून आला. त्याने चौकार षटकारांची आतिषबाजी केली. यासह सेहवागने षटकार खेचत इंडियाला विजय मिळवून दिला. सेहवागने नाबाद 80 धावा चोपल्या. तर सचिननेही26 चेंडूत 5 चौकारांसह 33 रन्सची नाबाद खेळी करत सेहवागला चांगली साथ दिली.
सेहवागने 80 धावांच्या खेळीसह स्वत:चा रेकॉर्ड मोडला. सेहवागने गेल्या वर्षी या स्पर्धेत विंडिज विरुद्ध 74 धावांची खेळी केली होती. ही सेहवागची सर्वोच्च धावसंख्या होती.
इंडियाचा या विजयासह हा तिसरा विजय ठरला आहे. याआधी गेल्या मोसमात इंडियाने विंडिज आणि श्रीलंकेचा पराभव केला होता.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्त खेळाडू हे या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत एकूण 6 संघ सहभागी झाले आहेत.
इंडिया लेजेंड्स (India Legends)
श्रीलंका लेजेंड्स (SriLanka Legends)
वेस्टइंडिज लेजेंड्स (West Indies Legends)
दक्षिण आफ्रिका लेजेंड्स (South Africa Legends)
बांगलादेश लेजेंड्स (Bangladesh Legends)
इंग्लंड लेजेंड्स (England Legends)
सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, मोहम्मद कैफ, युसुफ पठाण, नमन ओझा, झहीर खान, प्रज्ञान ओझा, नोएल डेव्हिड, मुनाफ पटेल, इरफान पठाण आणि मनप्रीत गोनी.
संबंधित बातम्या :
(virender sehwag scored 80 runs against Bangladesh Legends in Road Safety World T20 Series)