नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौर्यावर (India tour of England) रवाना होईल. या दौर्यावर टीम इंडिया 18 जूनपासून न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम लढत (2019–21 ICC Test Championship Final) लढणार आहे. यानंतर विराट कोहली आणि कंपनी यजमान इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. (Washington Sundar’s father M Sunder decided to stay in different house since son’s IPL return)
बीसीसीआयने (BCCI) कडक सूचना दिल्या आहेत की, जर कोणत्याही खेळाडूला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्याने इंग्लंड दौर्याबाहेर जाण्याचा विचार करावा. हे लक्षात घेऊन अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरचे (Washington Sundar) वडील एम सुंदर (M Sundar) यांनी आपल्या मुलाला या धोकादायक विषाणूपासून वाचविण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
वॉशिंग्टनच्या वडिलांनी 19 मे पर्यंत मुलापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडला जाणारे सर्व खेळाडू 19 तारखेला मुंबईत जमणार आहेत. भारतीय अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचे वडील एम. सुंदर हे चेन्नईमधील प्राप्तिकर विभागात (इनकमटॅक्स डिपार्टमेंट) प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आठवड्यातून तीन दिवस ऑफिसला जावे लागते.
चेन्नईमध्ये कोरोना व्हायरसची (Coronavirus) प्रकरणे वाढत आहेत. अशा परिस्थितीत एम. सुंदर यांनी असा निर्णय घेतला आहे की, ते त्यांच्या मुलासोबत एकाच घरात राहणार नाहीत. वॉशिंग्टनचे वडील आता दुसर्या घरात राहत आहेत आणि आपल्या कुटुंबाशी अधून-मधून ऑनलाईन संवाद साधत आहेत.
एम. सुंदर यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, जेव्हापासून वॉशिंग्टन आयपीएल खेळून आला आहे, तेव्हापासून मी एका वेगळ्या घरात राहत आहे. माझी पत्नी आणि मुलगी वॉशिंग्टनसोबत राहत आहेत. तो घरी आल्यापासून त्या दोघींनी घर सोडलेलं नाही. मी त्यांना फक्त व्हिडिओ कॉलद्वारे पाहतो. मला आठवड्यातून काही दिवस ऑफिसला जायचे आहे. माझ्यामुळे आमच्या घरातील कुणालाही कोरोना संसर्ग होऊ नये, असं मला वाटतं. त्यामुळेच मी माझ्या कुटुबियांपासून दूर राहतोय.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड, 18 ते 23 जून, साउथ्मपटन
विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव,
संबंधित बातम्या :
(Washington Sundar’s father M Sunder decided to stay in different house since son’s IPL return)