वॉशिंग्टन माझ्यापेक्षाही ‘सुंदर’ खेळला, शास्त्री गुरुजींकडून शाबासकी

| Updated on: Mar 07, 2021 | 5:16 PM

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेच्या विजयाची खास गोष्ट म्हणजे विजयाचे नायक विराट कोहली, पुजारा किंवा रहाणे नव्हते तर युवा खेळाडूंनी इंग्लंडला धूळ चारली.

वॉशिंग्टन माझ्यापेक्षाही सुंदर खेळला, शास्त्री गुरुजींकडून शाबासकी
Washington Sundar
Follow us on

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात (india vs england 2021 4th) टीम इंडियाने डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात टीम इंडियाने पहिल्या डावात 160 धावांची आघाडी घेतली होती. इंग्लंडने दुसऱ्या डावात सर्वबाद 135 धावा केल्यामुळे भारताचा या सामन्यात 25 धावा आणि डावाने विजय झाला . टीम इंडियाने या सामन्यासह ही मालिका 3-1 च्या फरकाने जिंकली आहे. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या कसोटी मालिकेच्या विजयाची खास गोष्ट म्हणजे या विजयाचे नायक विराट कोहली, चेतेश्वर पुजारा किंवा अजिंक्य रहाणे हे अनुभवी खेळाडू नव्हते तर युवा खेळाडूंनी टीम इंडियाच्या मालिका विजयात सिंहाचा वाटा उचलला. त्यामध्ये एका नावाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर. (Washington Sundar has more natural ability than I ever had, says Ravi Shastri)

भारताच्या या मालिका विजयानंतर आक्रमक फलंदाज ऋषभ पंत, फिरकीपटू अक्षर पटेल आणि अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर या तीन युवा खेळाडूंचं सर्वाधिक कौतुक होतंय. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीदेखील या नव्या खेळाडूंवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत फलंदाजी करताना अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरचं (washington sundar) पहिल्या शतकाचं स्वप्न अधुरं राहिलं. सुंदर तिसऱ्या दिवशी 96 धावांवर नाबाद राहिला. बेन स्टोक्सने भारताचा शेवटचा फलंदाज मोहम्मद सिराजला बोल्ड केल्याने टीम इंडियाचा पहिल्या डावातील खेळ 365 धावांवर आटोपला. सिराज बाोल्ड झाला. पण सुंदरचं शतक ठोकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. सुंदरने 174 चेंडूत 10 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 96 धावा केल्या. या सामन्यात सुंदरने फलंदाजी आणि गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली.

सुंदर माझ्यापेक्षा बेस्ट : रवी शास्त्री

मालिका जिंकल्यानंतर रवी शास्त्री म्हणाले की, वॉशिंग्टन सुंदर संघासाठी असलेली त्याची भूमिका चोख बजावतोय. सुंदरचा खेळ माझ्यापेक्षा नैसर्गिक आहे. मला असं वाटतं की, त्याने भारतीय मैदानांवर खेळताना टॉप 4 मध्ये फलंदाजी करावी. अंडर 19 क्रिकेटमध्ये तो संघासाठी सलामीला येऊन फलंदाजी करायचा. त्याची गोलंदाजीही उत्तम आहे. त्यात त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली तर तो संघातील 6 व्या क्रमांकावरील प्रमुख दावेदार ठरेल. फलंदाजीत 60-70 धावा करणारा आणि पुन्हा गोलंदाजीतही योगदान देणारा खेळाडू प्रत्येक संघाला हवा असतो. माझ्या क्रिकेट कारकीर्दित मी जी भूमिका निभावत होतो, तीच भूमिका सुंदर माझ्याहून उत्तम प्रकारे निभावू शकतो.

रिषभचं आक्रमण गुरुजी शास्त्रींना भावलं

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या मॅचमध्ये रिषभने ठोकलेलं आक्रमक शतक हे प्रत्युत्तरादाखल ठोकलेलं सर्वोत्तम शतक होतं, असं म्हणत खुद्द रवी शास्त्री यांनी रिषभच्या पाठीवर कौतुकाची थाप मारलीय. रिषभची खेळी ही आक्रमकतेने आणि जिद्दीने परिपूर्ण असलेली खेळी होती. त्याच्या खेळीने मॅचचा अंदाज पलटला, अशी स्तुतीसुमने रवी शास्त्री यांनी रिषभवर उधळली. रिषभने 118 चेंडूंचा सामना करताना 101 रन्स ठोकले. याच खेळीने इंग्लंडवर दबाव आला आणि भारताने ही मॅच एक डाव आणि 25 धावांनी जिंकत मालकाही आपल्या नावे केली, असं रवी शास्त्री म्हणाले.

इतर बातम्या

Video | कीपिंग करताना स्टंपमागे तु फार बडबडतोस, रोहितच्या प्रश्नावर रिषभ काय म्हणाला?

Shahid Afridi | ‘हा’ स्टार गोलंदाज बनणार शाहिद आफ्रिदीचा जावई

IPL 2021 Mumbai Indians Schedule | मुंबईकर ‘पलटण’ पहिल्या सामन्यात बंगळुरु विरुद्ध भिडणार, जाणून घ्या मुंबईच्या सामन्यांचे वेळापत्रक

(Washington Sundar has more natural ability than I ever had, says Ravi Shastri)