या मोसमात मुंबईकडून सलग तिसऱ्यांदा पराभव, धोनी म्हणतो…

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

चेन्नई : मुंबई इंडियन्सने क्वालिफायर वन सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जवर सहा विकेट्सने मात करत पाचव्यांदा फायनलचं तिकीट बूक केलं. चेन्नईने दिलेल्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने हे आव्हान सहा विकेट राखून पार केलं. चेन्नईला फायनलचं तिकीट गाठण्यासाठी आणखी एक संधी असेल. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विजयी संघासोबत चेन्नईचा सामना होईल. त्या सामन्यातील विजयी […]

या मोसमात मुंबईकडून सलग तिसऱ्यांदा पराभव, धोनी म्हणतो...
Follow us on

चेन्नई : मुंबई इंडियन्सने क्वालिफायर वन सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जवर सहा विकेट्सने मात करत पाचव्यांदा फायनलचं तिकीट बूक केलं. चेन्नईने दिलेल्या 132 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईने हे आव्हान सहा विकेट राखून पार केलं. चेन्नईला फायनलचं तिकीट गाठण्यासाठी आणखी एक संधी असेल. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात विजयी संघासोबत चेन्नईचा सामना होईल. त्या सामन्यातील विजयी संघाला फायनलमध्ये मुंबईचं आव्हान असेल.

सामन्यानंतकर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने फलंदाजांवर नाराजी व्यक्त केली. आमच्या फलंदाजांना आणखी चांगली कामगिरी करण्याची गरज असल्याचं मत त्याने व्यक्त केलं. कुणा एकाला तर पराभव स्वीकारावाच लागणार होता. आमच्या काही गोष्टी नीट झाल्या नाही. विशेषतः आमची फलंदाजी. आम्ही आमच्या होमग्राऊंडवर खेळतोय, तर आम्हाला इथली परिस्थिती समजायला हवी. आम्ही या खेळपट्टीवर सहा ते सात सामने खेळले आहेत आणि या वेळेत परिस्थिती समजायला हवी. होमग्राऊंडचा हाच फायदा असतो, असं म्हणत धोनीने फलंदाजांवर नाराजी व्यक्त केली.

आमच्या फलंदाजांचं काम होतं, की या खेळपट्टीचं वैशिष्ट्य त्यांनी समजून घ्यावं. चेंडू बॅटवर व्यवस्थित येतोय की नाही हे पाहायला हवं होतं. या अशा गोष्टी होत्या, ज्यात आम्हाला चांगलं करता आलं नाही. मला वाटतं, की आमच्या फलंदाजीमध्ये आणखी सुधारणा होण्याची आवश्यकता आहे, असं धोनी म्हणाला.

क्षेत्ररक्षणादरम्यान काही झेल सुटल्याबद्दलही धोनीने नाराजी व्यक्त केली. काही प्रमाणात आम्हाला नशिबानेही साथ दिली नाही. काही चेंडू योग्य जागेवर पडले होते, पण काही झेल सुटले. चेंडू हा फलंदाजांपासून दूर ठेवून चेंडूचा वेग कमी ठेवायचा होता, पण आमच्याकडे आवशक्य धावसंख्या नव्हती, असंही धोनीने सामन्यानंतर बोलताना सांगितलं.

मुंबईने या मोसमात चेन्नईवर सलग तिसऱ्यांदा मात केली. यापैकी दोन वेळा चेन्नईला होमग्राऊंडवर पराभव स्वीकारावा लागलाय. या मोसमात चेन्नईला होमग्राऊंडवर हरवणारा मुंबई इंडियन्स एकमेव संघ आहे. तीन वेळा आयपीएल चॅम्पियन ठरलेल्या मुंबईने पाचव्यांदा फायनलमध्ये धडक मारली आहे.