मुंबई : रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला जणू काही विजयाची सवयच लागून गेली आहे. एकदिवसीय मालिकेनंतर आता (T-20) टी-20 सामन्यातही विजयाची घोडदौड ही सुरुच आहे. पहिल्या टी-20 सामन्यात (Indian Team) भारतीय संघाने अव्हानात्मक अशा 191 धावा ठोकल्या होत्या. विजयाचे लक्ष मोठे असले तरी वेस्ट इंडिज फलंदाजांनी भारतीय गोलंदाजासमोर अक्षरश: लोटांगणच घेतल्याचा प्रत्यय आला. 191 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिज संघ केवळ 122 धावापर्यंतच मजल मारु शकला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विजयाची अखंड मालिका (Rohit Sharma) रोहित शर्माच्या नेतृत्वात सुरु आहे. 5 टी-20 मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने वेस्ट इंडिजसमोर धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिक यांचे मोठे योगदान राहिले आहे. कर्णधार रोहित शर्माने (64) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 41) धावा रचल्या. फलंदाच्या कामगिरीवर विजयाची पथका लावली ती खऱ्या अर्थाने गोलंदाजांनी. अर्शदीप सिंग (24/2) आणि रवी बिश्नोई (26/2) यांनी गोलंदाजी केल्यामुळे भारताने वेस्ट इंडिजवर 68 धावांनी विजय नोंदविला.
त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर असलेल्या स्टेडियमवर झालेल्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात विजयी लक्षाचा पाठलाग करताना इंडिज फलंदाजांनी सुरवात तर दणक्यात केली. काइल मेयर्स आणि शामरा ब्रूक्स यांनी पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारला दोन चौकार लगावले आणि त्यानंतर दुसऱ्याच षटकात मेयर्सने अर्शदीपसिंगच्या चेंडूवर एक षटकार आणि एक चौकारही मारला. त्यामुळे नेमके काय होणार हे कोणीच सांगू शकत नसताना याच षटकात अर्शदीपने मेयर्सला बाद केले. पॉवरप्लेमध्येच 45 धावांत 3 फलंदाज हे परतले होते. कर्णधार निकोलस पूरन यानेही निराशा केली. रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर यष्टीरक्षक पंतने त्याचा कॅच पकडला.
सलामीला आलेल्या सूर्यकुमार यादवला मैदान गाजवता आले नाही पण कर्णधार पदाला साजेल अशी कामगिरी रोहित शर्मा याने केली आहे. त्याने 64 धावा तर ठोकल्याच पण त्याही 44 चेंडूमध्ये. यात 7 चौकार आणि 2 षटकारांचाही समावेश आहे. या दोघांनी 44 धावांची भागिदारी केली पण रोहितला खरी साथ मिळाली ती दिनेश कार्तिकची. रोहित खंबीरपणे उभा राहिला आणि त्याने 35 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो रवींद्र जाडेजाच्या साथीने धावांचा वेग वाढवताना दिसत होता, पण हे दोघेही लागोपाठच्या षटकांमध्ये पुढे जात राहिले. कार्तिकने केवळ 19 चेंडूमध्ये 41 धावा रचल्या. यामध्ये 2 षटकार आणि 4 चौकारांचा समावेश आहे. भारतीय संघाने विजयी सुरवात तर केली आहे. आता आगामी सामन्यात काय चित्र राहणार हे पहावे औत्सुक्याचे ठरणार आहे.