ना एक धावा, ना एकही विकेट घेतली, तरीही मॅन ऑफ द मॅच, वाचा क्रिकेटमधली दुर्मिळ खेळी

| Updated on: Feb 09, 2021 | 10:54 AM

क्रिकेटमध्ये अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच (man of the match) पुरस्काराने गौरवण्यात येते.

ना एक धावा, ना एकही विकेट घेतली, तरीही मॅन ऑफ द मॅच, वाचा क्रिकेटमधली दुर्मिळ खेळी
कॅमरॉन कफी
Follow us on

मुंबई : क्रिकेटमध्ये (Cricket) दररोज अनेक रेकॉर्ड होतात, तसे ते ब्रेकही होतात. तशाच क्रिकेटमध्ये अनेक भन्नाट घटना ही घडतात, ज्यामुळे क्रिकेट चाहते आणि क्रीडा विश्वातही त्याची जोरदार चर्चा होते. अशीच एक घटना काही वर्षांपूर्वी घडली होती. ही गोष्ट आहे वेस्टइंडिजचे (West Indies Cricket Team) माजी खेळाडू (Cameron Cuffy) कॅमरुन कफींची. कफींना एका सामन्यात एकही धाव किंवा एकही विकेट न घेता त्यांना ‘सामनावीर’ (Man Of The Match) पुरस्कार मिळाला होता. साधारणपणे कोणत्याही सामन्यात अष्टपैलू कामगिरी किंवा विजयी खेळी करणाऱ्या खेळाडूला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारने गौरवण्यात येतं. पण कॅमरुन यांना काही विशेष न करता हा पुरस्कार कसा मिळाला हे जाणून घेऊयात. (west indies cricketer cameron cuffy man of the match award without any run and wicket in odi against zimbabwe)

झिंबाब्वे विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात 23 जून 2001 रोजी कोको कोला कपमधील सामना खेळण्यात आला. या सामन्यात झिंबाब्वेने टॉस जिंकून वेस्टइंडिजला फलंदाजीसाठी भाग पाडले. विंडिजने डॅरेन गंगा आणि ख्रिस गेल आणि शिवनारायण चंद्रपॉल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 266 धावा केल्या. यामुळे झिंबाब्वेला विजयासाठी 267 धावांचे आव्हान मिळाले.

विंडिजच्या गोलंदाजांनी सामन्याच्या दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना झिंबाब्वेला ठराविक अंतराने धक्के दिले. कॅमरुन कफींनी 10 ओव्हर गोलंदाजी केली. यात त्यांनी 2 मेडन ओव्हर टाकत अवघ्या 20 धावा देत शानदार गोलंदाजी केली. त्यांना विकेट घेण्यात यश आले नाही. पण झिंबाब्वेच्या फलंदाजांना बांधून ठेवलं होते. विंडिजच्या गोलंदाजांनी आपल्या भेदक माऱ्यासमोर झिंबाब्वेला 50 ओव्हरमध्ये 239 धावाच करता आल्या. यामुळे विंडिजचा 27 धावांनी विजय झाला.

कॅमरुन यांची क्रिकेट कारकिर्द

कॅमरुन यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 15 सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या आहेत. तर 41 वनडेमध्ये 41 फलंदाजांना बाद केलं आहे. तसेच त्यांनी 86 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 252 बळी घेतल्या आहेत. सोबतच 98 लिस्ट ए सामन्यात 105 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. कॅमरुन यांनी टीम इंडिया विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. एकूण 15 सामन्यांमध्ये कॅमरुनने सचिन तेंडुलकरला तब्बल 3 बाद केलं.

संबंधित बातम्या :

रोहित शर्माच्या मागे ‘पनौती’, 477 दिवसात एकही शतक नाही, संघातून स्थान मिळणार की नाही?

VIDEO : भर पत्रकार परिषदेत इंग्लंडच्या गोलंदाजाच्या डोक्यावर बोर्ड कोसळला, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Rishabh Pant | टीम इंडियाचा रिषभ पंत ठरला ICC Men’s Player of the Month पुरस्कराचा मानकरी

(west indies cricketer cameron cuffy man of the match award without any run and wicket in odi against zimbabwe)