अँटिगा : वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका (West Indies vs Sri Lanka) यांच्यातील तिसरा टी 20 सामना (3 rd T 20I) रविवारी 7 मार्चला पार पडला. विंडिजने हा तिसरा सामना 3 विकेट्सने जिंकला. या विजयासह यजमान विंडिजने 2-1 च्या फरकाने मालिका जिंकली. या टी 20 मालिकेचं आणि 6 चेंडूंचं एक वेगळं कनेक्शन आहे. यामुळे श्रीलंकेचा पराभव झाला. (west indies vs sri lanka 3rd t 20 all rounder Fabian Allen scored 21 runs in 6 ball at Antigua)
या तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवात फार चांगली राहिली नाही. पण मधल्या फळीतील दिनेश चांदिमालने 54 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित 20 षटकात 4 विकेट्स गमावून 131 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे विडिंजला विजयासाठी 132 धावांचे आव्हान मिळाले. हे विजयी आव्हान विंडिजने 6 चेंडूआधी 7 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. म्हणजेच तिसरा सामना विंडिजने 3 विकेट्सने जिंकला.
या सामन्यात विंडिजचा अष्टपैलू खेळाडू फॅबियन अॅलन श्रीलंकेवर वरचढ ठरला. त्याने या सामन्यात बॅटिंग आणि बॉलिंगने अष्टपैलू कामगिरी केली. फॅबियनने या सामन्यातील एकूण 4 ओव्हर गोलंदाजी केली. त्यात त्याने 13 धावा देत श्रीलंकेचा सलामीवीर धनुष्का गुनाथिलकला आऊट केलं. त्यानंतर बॅटिंग करताानही श्रीलंकेच्या गोलंदाजांना चांगलाच चोपला. फॅबियनने अवघ्या 6 चेंडूत 21 धावा ठोकत श्रीलंकेचा गेम ओव्हर केला. फॅबियनच्या या खेळीत 3 सिक्स खेचले. म्हणजेच त्याने सिक्सच्या मदतीने 18 धावा केल्या. तर उर्वरित 3 धावा या धावून पूर्ण केल्या.
Cometh the hour..cometh the man! In one stroke Fabian Allen seals the series victory for the #MenInMaroon #WIvSL pic.twitter.com/ffFkNliIF6
— Windies Cricket (@windiescricket) March 8, 2021
फॅबियनला आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी पंजाब किंग्सने 75 लाख मोजून आपल्या ताफ्यात घेतलं. फॅबने या तिसऱ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत पंजाबचा निर्णय योग्य ठरवला. त्यामुळे पंजाबला फॅबकडून आयपीएलच्या 14 व्या हंगामात अशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे. दरम्यान आयपीएलच्या 14 व्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून होत आहे.
यंदाच्या आयपीएलच्या 14 व्या मोसमाचं आयोजन हे भारतात करण्यात आलं आहे. या मोसमात एकूण 60 सामने खेळवण्यात येणार आहेत. यामध्ये 56 साखळी सामने, 3 बाद फेरीतील मॅच आणि अंतिम सामना अशा एकूण 60 मॅचेस असणार आहेत. आयपीएलचा थरार एकूण 6 शहरात आणि 51 दिवस रंगणार आहे. विशेष म्हणजे या वेळेस एकही संघ आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार नाही. यंदाच्या साखळी फेरीतील सामन्यांचं आयोजन हे त्रयस्थ ठिकाणी करण्यात आले आहे. यामुळे आपल्या होम कंडीशनचा फायदा कोणत्याच संघाला होणार नाही. यामुळे अशा परिस्थितीत कोणता संघ बाजी मारणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
Video | कायरन पोलार्डचा तडाखा, 6 चेंडूत 6 सिक्स, युवराजच्या विक्रमाशी बरोबरी
(west indies vs sri lanka 3rd t 20 all rounder Fabian Allen scored 21 runs in 6 ball at Antigua)