मुंबई : टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझिलंड (NZ) दौऱ्यावर आहे. कालपासून टीम इंडिया आणि न्यूझिलंडच्या T20 मालिकेला सुरुवात झाली आहे. काल मॅचपुर्वी मैदानावर मुसळधार पाऊस सुरु झाला, त्यानंतर तिथली मॅच रद्द करण्यात आली होती. न्यूझिलंड मधील T20 मालिकेसाठी हार्दीक पांड्याला (Hardik Pandya) कर्णधारपद देण्यात आलं आहे. विश्वचषक स्पर्धेत खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना आराम देणार असल्याची माहिती बीसीसीआयने (BCCI) जाहीर केली आहे. त्याचबरोबर पुढच्या काही दिवसात टीम इंडियामध्ये मोठा बदल होणार असल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे.
सध्या टीममध्ये असलेल्या खेळाडूंनी अधिक आयपीएल खेळलं आहे. त्यामुळे आम्ही खेळण्यासाठी सगळे खेळाडू सज्ज आहोत. कालच्या मॅचमध्ये पाऊस पडल्यामुळे कालचा सामना होऊ शकला नाही. आम्हाला सगळ्यांना T20 फॉरमॅटमध्ये कशी खेळी करायची हे माहिती आहे.
हार्दीक पांड्याने सध्याच्या टीममध्ये असलेल्या खेळाडूंच्या भविष्याबाबत सुद्धा एक गोष्ट सांगितली आहे. टीममध्ये असलेल्या खेळाडूंना सिद्ध करण्याची ही वेळ आली आहे. ही मालिका युवा खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या मालिकेमधून प्रत्येकजण आपला एक वेगळा रोल सिद्ध करेल. सद्याच्या टीममध्ये गरज लागल्यास काही वरिष्ठ खेळाडू समाविष्ठ होऊ शकतात.
ज्यावेळी टीम इंडियाचा पराभव झाला, त्यावेळी टीम इंडियातील वरीष्ठ खेळाडूंनी स्वत: मध्ये बदल करावा अन्यथा निवृत्ती घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. या विशेष चर्चेदरम्यान हार्दिक पांड्या टी-20 चा कर्णधार व्हावा अशी अनेकांची इच्छा आहे.