आशिया चषकात (Asia Cup 2022) टीम इंडियाच्या गोलंदाजांनी खराब कामगिरी केल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) मालिकेत जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) खेळवण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सुध्दा त्याला अधिक चांगली कामगिरी करता आली नाही. फलंदाजांनी चांगली खेळी केल्यामुळे टीम इंडियाने मालिका जिंकली.
जसप्रीत बुमराहला पुन्हा दुखापत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिका मालिका त्याला अर्धवट सोडावी लागली आहे. त्याचं दुखणं वाढल्याची माहिती मिळाली आहे.
? NEWS ?: Mohd. Siraj replaces injured Jasprit Bumrah in T20I squad. #TeamIndia | #INDvSA
More Details ?https://t.co/o1HvH9XqcI
— BCCI (@BCCI) September 30, 2022
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे ती मॅच एकहाती जिंकता आली. फलंदाज सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.
जसप्रीत बुमराहच्या जागी सिराजला संधी दिल्यामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. सोशल मीडिया मोहम्मद शमीने काय चूक केली होती असे चाहते म्हणत आहेत.
मोहम्मद शमीचा विश्वचषक स्पर्धेत राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता. परंतु त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.