Bhuvneshwar Kumar : पराभवानंतर भुवनेश्वर कुमारच्या मीम्सचा रेकॉर्ड, चाहते संतापले

| Updated on: Sep 21, 2022 | 10:19 AM

भुवनेश्वर कुमारचे मीम्स व्हायरल झाले आहेत.

Bhuvneshwar Kumar : पराभवानंतर भुवनेश्वर कुमारच्या मीम्सचा रेकॉर्ड, चाहते संतापले
मीम्सचा पाऊस
Image Credit source: twitter
Follow us on

आशिया चषकात (Asia Cup 2022) खराब कामगिरी केल्यानंतर भुवनेश्वर (Bhuvneshwar Kumar) कुमारवरती जोरदार टीका झाली होती. कारण संपुर्ण आशिया चषकात अत्यंत खराब गोलंदाजी केली होती. ऑस्ट्रेलिया (Australia) विरुद्धच्या कालच्या झालेल्या सामन्यात सुद्धा त्याने चाहत्यांचा अपेक्षाभंग केल्यामुळे चाहत्यांनी त्याचे मीम्स व्हायरल केले आहेत. त्यामुळे पुन्हा त्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.

कालच्या झालेल्या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करीत असताना मोठी धावसंख्या उभारली. त्यामुळे मॅच पाहण्यात चाहत्यांची उत्सुकता वाढली. परंतु अक्षर पटेल सोडला तर एकाही गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करता आली नाही. पुन्हा टीका व्हायला सुरुवात झाली आहे.

कालच्या मॅचमध्ये 19 व्या ओव्हरमध्ये 19 दिले, त्यामुळेचं भुवनेश्वरला नेटकऱ्यांनी चांगलचं ट्रोल केलं आहे. श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात सुद्धा भुवनेश्वरने अशी कामगिरी केली होती, त्यावेळी निराश झालेल्या नेटकऱ्यांनी त्यावेळी सुद्धा ट्रोल केलं होतं.

भुवनेश्वर कुमारचे मीम्स व्हायरल झाले आहेत. नेटकऱ्यांनी अनेक मीम्स बनवल्या आहेत. त्या पाहत असताना कोणालाही हसू कंट्रोल होणार नाही अशी स्थिती आहे.