विराट कोहलीच्या क्षेत्ररक्षणावर अजय जाडेजाची टिप्पणी, म्हणाला…

| Updated on: Dec 08, 2020 | 10:48 AM

विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात त्याच्या या लौकिकाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. | Virat Kohli

विराट कोहलीच्या क्षेत्ररक्षणावर अजय जाडेजाची टिप्पणी, म्हणाला...
Follow us on

सिडनी: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर म्हणावा तसा सूर अद्याप गवसलेला नाही. फलंदाजीत त्याला अजूनही फारशी चमक दाखवता आलेली नाही. तर दुसरीकडे क्षेत्ररक्षणातही विराटकडून खराब कामगिरी झाली आहे. या पार्श्वभूमीवर भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जाडेजा याने मजेदार टिप्पणी केली आहे. आपल्याकडून सोपे झेल सुटतात तेव्हा नंतर आपल्याकडे येणारा प्रत्येक चेंडू आपल्याला एखाद्या बॉम्बसारखा वाटतो, असे अजय जाडेजा याने म्हटले. (Ajay Jadeja Opens Up On Why Virat Kohli Is Dropping Sitters)

विराटने दोन सामन्यांमध्ये सोडले होते सोपे झेल

विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांपैकी एक आहे. मात्र, ऑस्ट्रेलियात त्याच्या या लौकिकाला ग्रहण लागल्याचे चित्र आहे. कॅनबेरा येथील पहिल्या ट्वेन्टी-20 सामन्यात विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या डीआर्सी शॉर्ट याचा सोपा झेल सोडला होता. त्यानंतर सिडनीतील सामन्यातही विराटने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेडचा झेल सोडला होता.

आपण गेल्या कित्येक वर्षांपासून विराटला असामान्य असे झेल घेताना पाहत आहोत. कॅनबेराच्या सामन्यात त्याच्याकडे झेल टिपण्यासाठी बराच अवधी होता. विराट झेल घेण्यासाठी वाट बघत होता, मात्र चेंडू हातात आल्यानंतर पटकन निसटला. त्याचे संतुलन बिघडल्यामुळे तसे झाले असावे. मात्र, अशा गोष्टी घडत असतात. परंतु, सामन्यात एखादा झेल सुटल्यानंतर नंतर तुमच्याकडे येणारा प्रत्येक चेंडू तुम्हाला बॉम्बसारखा वाटतो, असे जाडेजाने म्हटले.

विचित्र पद्धतीने रनआऊट झाला होता ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

विराटने सिडनीच्या सामन्यात मॅथ्यू वेडचा झेल सोडला. मात्र, नंतर विराटने त्याला धावचीत करून याची भरपाई केली होती. कव्हर्समध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराट कोहलीने वेडसचा झेल पकडताना चेंडू जमिनीवर टेकला होता. तेव्हा आपण बाद झालो आहोत, असे वाटून मॅथ्यू वेडस क्रीझ सोडून पॅव्हेलियनच्या दिशेने चालायला लागला होता. ही गोष्ट विराट कोहलीच्या लक्षात आली तेव्हा त्याने क्षणाचीही अवधी न दडवता वेडसला बाद केले.

संबंधित बातम्या: 

24 डावात 7 अर्धशतकं, 839 धावा, मात्र शतकी खेळी करण्यास विराट कोहली अपयशी

विराट कोहलीने रचला इतिहास, हा रेकॉर्ड करणारा 9 वा भारतीय खेळाडू

विराट कोहली वन डेमधील सर्वश्रेष्ठ खेळाडू, ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचकडून कौतुक

(Ajay Jadeja Opens Up On Why Virat Kohli Is Dropping Sitters)