मेलबर्न : ऑस्ट्रेलियात (Australia) विश्वचषक (T20 World Cup 2022) सुरु झाल्यापासून अनेक खेळाडू सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहेत. चांगली कामगिरी केल्यानंतर त्याचे व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आशिया चषकापासून विराट कोहली (Virat Kolhi) चांगली फलंदाजी करीत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानविरुद्धच्या रोमांचक मॅचमध्ये चांगली पारी खेळल्यामुळे विराटचं चाहत्यांनी कौतुक केलं. तसेच विराटनेही चाहत्याचे आभार मानले आहेत.
विराट कोहलीने एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये त्याच्या हॉटेलच्या रुममधील सगळं साहित्य दिसत आहे. हा व्हिडीओ त्याच्या चाहत्याने रुममध्ये घुसून तयार केला आहे. त्यामुळे विराट कोहली अधिक नाराज झाला आहे.
ज्यावेळी विराट रुममध्ये नव्हता, त्यावेळी विराटचे चाहते त्याच्या रुममध्ये घुसले. तिथं एक व्हिडीओ तयार केला. तो व्हिडीओ चाहत्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हे प्रकरण विराटला खटकल्याने तो व्हिडीओ त्याने स्वत: च्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
मला माहिती आहे की, खेळाडूंना भेटण्यासाठी फॅन अधिक तरसलेले असतात. तसेच खेळाडू नेहमी खूष राहण्यासाठी चाहते चांगल्या गोष्टी करीत असतात. रुममध्ये अशा पद्धतीने घुसणे मला आवडलेलं नाही. तसेच आम्हाला काही खासगी आयुष्य आहे की नाही. मला आता खासगी आयुष्याबाबत चिंता वाटायला लागली आहे.