नवी दिल्ली : दारा सिंग हे नाव घेताचं आठवते ती कुस्ती. या कुस्तीपटूनं जगातील कुस्तीपटूंना पाणी पाजले होते. 130 किलो वजन असताना 200 किलो वजनाच्या कुस्तीपटूला हरविले होते. तेव्हापासून जगात त्यांच्या नावाचा दबदबा होता. दारा सिंग यांना रुस्तम ए हिंदची उपाधी बहाल करण्यात आली. दारा सिंग हे पंजाबचे कुस्तिपटू होते. ५०० सामन्यांपैकी एकही सामना ते हरले नव्हते. जगात भारतीय कुस्तिपटूंना वेगळी ओळख निर्माण करून दिली. रामायणात त्यांनी हनुमानाची भूमिका साकारली होती. अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक आणि राजकारणातही त्यांनी सहभाग घेतला. एक वेळा त्यांनी २०० किलो वजनाचे ऑस्ट्रेलियाचे कुस्तीपटू किंग काँगला हरविलं होतं. तेव्हापासून त्यांची चर्चा जगात सुरू झाली.
दारासिंग यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९२८ ला जन्म झाला. ते अमृतसरच्या एका छोट्या गावात जन्माला आले. दारा सिंग यांचं खरं नाव दीदारसिंह रंधावा होते. लहानपणी त्यांचं मन अभ्यासात लागत नव्हतं.
लहानपणी घरी शेतीची कामं करत असतं. ९ वर्षांचे असताना त्यांचं लग्न झालं. त्यांच्यापेक्षा मोठ्या असलेल्या महिलेशी त्यांचं लग्न झालं. त्यामुळं दारा सिंग यांनाही १०० बदाम, दूध, दही अशी खुराक घेत होते. ते १७ वर्षांचे असताना त्यांना पहिला मुलगा झाला.
पहिल्या पत्नीसोबत त्यांचा घटस्फोट झाला. दुसऱ्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं व तीन मुली झाल्या. सिंगापूरमधून त्यांनी कुस्तीची सुरुवात केली.
१९४७ साली ते एका नातेवाईकासोबत ते पैसे कमविण्यासाठी सिंगापूरला गेले. एका मिलमध्ये ते काम करत होते. त्यानंतर त्यांनी कुस्तीचे प्रशिक्षण घेतले.
इटलीतील कुस्तीपटूला हरवून त्यांना ५० डॉलर मिळाले. १९५० मध्ये त्यांनी चँपियन ऑफ मलेशियाचा किताब जिंकला. त्याकाळल्या २०० किलो वजनाच्या किंग काँग या कुस्तीपटूला त्यांनी हरविले.
तेव्हापासून त्यांनी मागे वळून पाहिलेचं नाही. १९५३ मध्ये मुंबईत ते भारतीय चँपियन बनले. १९५९ मध्ये कोलकाता येथे त्यांनी जगातील सर्वोत्तम कुस्तीपटूंना हरविले.