मुंबई : दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) त्याची मैत्रीण इशा नेगी (Isha Negi) सोबत सध्या रिलेशीपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. त्या दोघांचे एकत्र फोटो इशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केले आहेत. तसंच अनेकदा ते डिनरला जाताना स्पॉट झाले आहेत. रिषभ पंत आक्रमक स्वभावासाठी ओळखला जातो तर इशा ‘स्ट्रेट फॉरवर्ड’ स्वभावाची आहे. अशातच इशाला ‘तुझा आवडता क्रिकेटर कोण?’ असा प्रश्न विचारला गेला. यावर कोणतेही आढेवेढे न घेता तिने सरळ सरळ उत्तर दिलं. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने रिषभ पंतचं नाव तर घेतलंच नाही किंबहुना विराट कोहलीचं देखील तिने नाव घेतलं नाही. (Who is Your Favorite Cricketer, Rishabh Pant Girl Friend Isha Negi Said MS Dhoni)
रिषभची मैत्रीण इशा देहरादूनची रहिवासी आहे. तिने इंटेरिअर डिझाइनचं शिक्षण घेतलंय. इन्स्टाग्रामवर ती फारच अॅक्टिव्ह असते. रिषभने तिच्यासोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टावर शेअर केले आहेत. तसंच इशानेही दोघांचे फोटो शेअर केले आहेत. चाहत्यांनी ‘इशाला तुझा आवडता क्रिकेटर कोण?’, असा प्रश्न केल्यानंतर तिने महेंद्रसिंग धोनीचं (MS Dhoni) नाव सांगितलं. धोनीचा कूल अंदाज आपल्याला आवडतो, असं उत्तर तिने दिलं.
दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत त्याची मैत्रीण इशा नेगी सोबत सध्या रिलेशीपमध्ये आहे. इशा देहरादूनची रहिवासी आहे. तिने इंटेरिअर डिझाइनचं शिक्षण घेतलंय. इन्स्टाग्रामवर ती फारच अॅक्टिव्ह असते. रिषभने तिच्यासोबतचे काही फोटो त्याच्या इन्स्टावर शेअर केले आहेत. तिच्यासोबतचा एक फोटो शेअर करताना रिषभने लिहिलंय. “मला तुला आनंदी ठेवायचंय. कारण तू माझ्या आनंदाला कारण आहे.”, अशा भावना व्यक्त करत रिषभने आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
भारतीय संघाचा युवा किकेट कीपर फलंदाज रिषभ पंत गेल्या काही दिवसांपासून यशाच्या शिखरावर आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात त्याला संघात स्थान द्यावं की नाही, यावरुन वाद होता. मात्र डिसेंबर ते मार्चदरम्यान रिषभ पंतने आपल्या खेळीने अशी काही कमाल केलीय की आता त्याच्याकडे थेट आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दिल्ली कॅपिटल्सचं कर्णधार दिलं गेलंय.
सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत दिल्ली कॅपिलल्सच्या कर्णधारपदी रिषभ पंतच्या नावाची घोषणा झाली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा दिग्गज खेळाडू आणि कर्णधार श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त असल्याने त्याच्या ऐवजी 23 वर्षांच्या रिषभवर संघाच्या कर्णधापदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रहाणे, धवन, स्मिथ, अश्विन अशा एकापेक्षा एक दिग्गज खेळाडूंना पछाडत पंतने बाजी मारली. आयपीएलच्या 14 व्या मोसमात आता दिल्लीचं नेतृत्व रिषभच्या हाती देण्यात आलं आहे.
(Who is Your Favorite Cricketer, Rishabh Pant Girl Friend Isha Negi Said MS Dhoni)
हे ही वाचा :
रिषभ पंतसोबत रिलेशनशीपच्या चर्चा, उर्वशी रौतेलाचं खोचक उत्तर
केवळ दिल्लीचं नाही तर येणाऱ्या काळात रिषभ पंत भारताचं नेतृत्व करेन; या दिग्गज खेळाडूची भविष्यवाणी