चेन्नई : आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आज मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद (Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad ) आमनेसामने येत आहे. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर दोन्ही संघादरम्यान ही लढाई होणार आहे. या मोसमात सगळ्या संघांनी आतापर्यंत दोन दोन सामने खेळले आहेत. हैदराबाद वगळता सगळ्या संघांना विजयाची चव चाखण्यात यश आलंय. पहिल्या दोन सामन्यात थोड्या फार फरकाने हैदराबादला पराभव स्वीकारावा लागला आहे. केकेआरकडून 10 रन्सने हैदराबादला पराभूत व्हावं लागलं होतं तर बंगळुरुने हैदराबादला 06 रन्सने हरवलं होतं. आता आजच्या सामन्यात काहीही करुन पहिला विजय मिळवण्याचा हैदराबाद संघ प्रयत्न करेन. (Who will Win Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad Match Stat 17 April In marathi)
मुंबईने खेळलेल्या 2 सामन्यांपैकी एका सामन्यात हार तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. बंगळुरुविरुद्धची सलामीची लढत मुंबइने शेवटच्या बॉलवर गमावली. तर रोमांचक सामन्यात मुंबईने कोलकात्याला पराभवाची धूळ चारली. साहजिक कोलकात्याला नमवून विजयाची लय सापडलेला मुंबई संघ दुसऱ्या विजयाच्या आशाने मैदानात उतरेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध हैदराबाद यांच्यात आयपीएलच्या पीचवर एकूण 16 वेळा सामने झाले आहेत. त्यातील 8 सामने मुंबईने जिंकले आहेत तर 8 सामने हैदराबादने जिंकले आहेत. म्हणजेच दोघांचंही पारडं समसमान आहे. पाठीमागील मोसमातही पारडं समान राहिलं आहे. मागील मोसमात मुंबई हैदराबाद दोन वेळा आमने सामने आले. यातील पहिल्या सामन्यात मुंबईने 34 रन्सने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात हैदराबादने मुंबईला 10 विकेट्सने पराभूत केलं.
यंदाच्या मोसमात मुंबई हैदराबादवर वरचढ दिसत आहे तसंच टीमही बॅलन्स दिसत आहे. मुंबईने ज्याप्रकारे शेवटच्या सामन्यात कोलकात्याला हरवलंय त्यामुळे मुंबईचा आत्मविश्वास दुणावलेला आहे. तर दुसरीकडे मोसमातील आपल्या पहिल्या विजयासाठी हैदराबादचा संघ संघर्ष करताना दिसून येईल.
आजच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यात हैदराबाद संघात फलंदाजीमध्ये काही बदल दिसू शकतात. आजच्या मॅचमध्ये मनीष पांडे किंवा साहा यादोघांपैकी एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी मुंबई संघात बदल होण्याची शक्यता कमी आहे. परंतु जर काही बदल झालाच तर मार्को जेन्सनच्या ऐवजी नॅथन कुल्टर नाईलला संधी मिळू शकते.
(Who will Win Mumbai Indians vs Sunrisers Hydrabad Match Stat 17 April In marathi)
हे ही वाचा :
IPL 2021 MI vs SRH : मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, सामना कधी, कुठे, केव्हा?
IPL 2021 : ‘धोनीला म्हातारपणाची जाणीव’, 200 सामने पूर्ण करताच मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ…
IPL 2021 : चेन्नईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर के एल राहुलला दु:ख, म्हणतो, ‘माझ्याजवळ बोलायला…’