PBKS vs MI, IPL 2021 Match Prediction | पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने, कोण जिंकणार सामना?

| Updated on: Apr 23, 2021 | 5:03 PM

केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाब किंग्सचा सामना (Punjab Kings) 5 वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) होणार आहे.

PBKS vs MI, IPL 2021 Match Prediction | पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स आमनेसामने, कोण जिंकणार सामना?
केएल राहुलच्या नेतृत्वात पंजाब किंग्सचा सामना (Punjab Kings) 5 वेळा विजेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) होणार आहे.
Follow us on

चेन्नई | आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 17 वा सामना आज (23 एप्रिल) पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या मॅचचे आयोजन चेन्नईतील एमए चिदंबरम (MA Chidambaram Stadium) स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. दोन्ही संघांचा गेल्या सामन्यात पराभव झाला आहे. पंजाबला हैदराबादने पराभूत केलं होतं. तर दिल्लीने मुंबईवर मात केली होती. फलंदाजीमुळे दोन्ही संघांना पराभव स्वीकारावा लागला होता. (who will win pbks vs mi ipl 2021 today match punjab kings vs mumbai indian prediction previous match stats in marathi)

आकडेवारी काय सांगते?

उभयसंघ आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 26 वेळा आमनेसामने भिडले आहेत. दोन्ही संघ जवळपास तुल्यबळ आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने 14 सामन्यात विजय मिळवला आहे. तर पंजाबने 12 मॅचेसमध्ये मुंबईवर मात केली आहे.

दोन्ही संघांची यंदाच्या मोसमातील कामगिरी

दोन्ही संघांना आतापर्यंत या 14 व्या मोसमात विशेष कामगिरी करत आलेली नाही. मुंबईने 4 सामन्यांपैकी 2 सामन्यात विजय झाला आहे. तर 2 मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाबची मुंबईपेक्षा वाईट स्थिती आहे. पंजाबला या पर्वात एकूण 4 मॅचपैकी 3 पराभव झाला आहे. पंजाबची विजयी सुरुवात झाली. मात्र त्यानंतर सलग 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

मुंबईची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी

मुंबईचे फलंदाज सातत्याने अपयशी ठरतायेत. कर्णधार रोहित शर्माने दिल्ली विरुद्ध चांगली कामगिरी केली. मात्र त्याला मुंबईच्या कोणत्याही फलंदाजाने चांगली साथ दिली नाही. मुंबईसाठी सलामी फलंदाजांसह मीडल ऑर्डरची कामगिरीही डोकेदुखीचा विषय ठरतोय. सूर्यकुमार यादव आणि ईशान किशनलाही विशेष काही करता आलेले नाही.

तसेच पंड्या बंधू आणि कायरन पोलार्डलाही सूर गवसलेला नाहीये. मुंबईचे गोलंदाज अपेक्षित कामगिरी करत विजय मिळवून देत आहेत. मात्र दिल्ली विरुद्ध गोलंदाजही अपयशी ठरले. त्यामुळे आता पंजाब विरुद्धच्या या सामन्यातून विजय मिळवत पलटणचा जोरदार कमबॅक करण्याचा मानस असणार आहे.

पंजाबचा चांगल्या सुरुवातीनंतर सलग पराभव

पंजाबने या मोसमाची विजयाने सुरुवात केली. त्यानंतर मात्र पंजाबची रेल्वे रुळावरुन घसरली. पंजाबला सलग 3 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला. पंजाबचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेलला संघर्ष करावा लागतोय. तर निकोलस पूरनही 3 वेळा शून्यावर बाद झालाय. तसेच टीम मॅनेजमेंट प्लेइंग इलेव्हनमध्ये डेव्हिड मलानला संधी देऊ शकते. तसेच रवी बिश्नोईलाही संधी मिळू शकते. रवीने गेल्या मोसमात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. त्यामुळे या सामन्यात पंजाब विजय मिळवणार की मुंबई वरचढ ठरणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स

रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, आदित्‍य तरे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, ट्रेन्ट बोल्‍ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, क्रुणाल पांड्या, ख्रिस लिन, राहुल चाहर, हार्दिक पांड्या, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, अनुकूल रॉय आणि इशान किशन, नॅथन कुल्टर नाइल, पीयूष चावला, युद्धवीर चरक, मार्को जॅनसन, अर्जुन तेंडुलकर आणि जेमी निशाम.

संबंधित बातम्या :

IPL 2021 PBKS vs MI Head to Head | पंजाबचे किंग्स की मुंबईची पलटण, कोण मारणार बाजी, आकडेवारी कोणाच्या बाजूने?

RCB vs RR 2021, Virat Kohli | कोहलीचा भीमप्रराक्रम, आयपीएलमध्ये ‘विराट’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज

(who will win pbks vs mi ipl 2021 today match punjab kings vs mumbai indian prediction previous match stats in marathi)