अहमदाबाद : आयपीएलच्या 14 व्या मोसमात (IPL 2021) आज (30 एप्रिल) पंजाब किंग्स (Punjab Kings) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात लढत रंगणार आहे. या सामन्याचे आयोजन अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना बंगळुरु विरुद्ध बंगळुरु असं म्हटल्यास वावगं ठरु नये. कारण पंजाब टीममधील बरेचशा खेळाडूंनी याआधी बंगळुरुचे प्रतिनिधित्व केलं आहे. यामध्ये कर्णधार केएल राहुल, मयंक अग्रवाल आणि ख्रिस गेलने समावेश आहे. गत मोसमात विराट कोहलीवर (Virat Kohli) त्याचे हे माजी सहकारी वरचढ ठरले होते. यावेळस विराटच्या चांगली कामगिरी करतोय. तर पंजाबला संघर्ष करावा लागतोय. (who will win punjab kings vs royal challengers bangalore ipl 2021 today match prediction previous match 3o april in marathi)
पंजाबला या मोसमात आतापर्यंत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. पंजाबने आतापर्यंत 6 पैकी 2 सामन्यात विजयाची नोंद केली आहे. तर बंगळुरुने 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. बंगळुरुला आतापर्यंत महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नईकडून एकमेव पराभव स्वीकारावा लागला आहे. बंगळुरुने आपल्या अखेरच्या सामन्यात दिल्ली कॅपिट्ल्सचा 1 धावेने पराभव केला होता. यासह बंगळुरुचे 10 पॉइंट्स झाले होते. आरसीबी ताज्या आकडेवारीनुसार पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर पंजाब 4 गुणांसह 6 व्या क्रमांकावर आहे.
पंजाबचे गोलंदाज समाधानरकारक कामगिरी करत आहेत. मात्र त्यांच्या फलंदाजांना आपल्या कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश येत आहे. पंजाबची आतापर्यंतची कामगिरी ही निराशाजनक राहिली आहे. स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आणि कर्णधार केएल राहुललाही धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. मयंक अग्रवालने काही धावा केल्या. मात्र इतर फलंदाजांना विशेष असं काही करता येत नाहीये. पंजाबने 6 सामन्यांमधील पहिल्या 3 मॅचमध्ये पहिले बॅटिंग करताना 106, 120 आणि 123 निच्चांकी धावा केल्या.
मिस्टर 360 ने पुन्हा शानदार फलंदाजी केली. तसेच गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर बंगळुरुने पाचवा विजय संपादित केला. बंगळुरुच्या फलंदाजीची जबाबदारी ही कर्णधार विराट कोहली, देवदत्त पडीक्कल, एबी डीव्हीलियर्स आणि ऑस्ट्रेलियाचा ऑलराउंडर ग्लेन मॅक्सवेलरवर आहे. हे सर्व फलंदाज आपली भूमिका चोखपणे पार पाडत आहेत.
रजत पाटीदारने मागील सामन्यात आपल्यात असलेल्या प्रतिभेचं दर्शन घडवलं. तर कायले जेमिन्सनमध्ये फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. तसेच बंगळुरुचे गोलंदाजही प्रभावी मारा करताहेत. हर्षल पटेल सातत्याने चांगली गोलंदाजी करतोय. तसेच मोहम्मद सिराजही त्याला चांगली साथ देतोय. त्यामुळे आजच्या या सामन्यात बंगळुरु विजय मिळवणार, की पंजाब मात करणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
संबंधित बातम्या :
(who will win punjab kings vs royal challengers bangalore ipl 2021 today match prediction previous match 3o april in marathi)