जेव्हापासून जगात क्रिकेट खेळलं जात आहे. तेव्हापासून प्रत्येक खेळाडूच्या नावावर एक नवा रेकॉर्ड (New Record) तयार झाला आहे. काही रेकॉर्डचे व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) आजही लोकं आवडीने पाहतात. कारण त्यावेळची खेळीचं अविस्मरणीय असते. आत्तापर्यंत भारतीय खेळाडूंनी अनेक रेकॉर्ड केले आहे. त्यामध्ये युवराज सिंग (Yuvraj Singh) अव्वल स्थानी आहे, कारण त्याच्या नावावर सहा सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आहे.
टी 20 क्रिकेट सुरु झाल्यापासून जगातल्या प्रत्येक खेळाडूने एक नवा रेकॉर्ड केला आहे. कारण हा खेळ असा आहे की, शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच कोण जिंकेल हे कोणीचं सांगू शकत नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ज्यावेळी टी 20 क्रिकेटचा सामना सुरु होता. त्यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता. कारण इंग्लंडच्या एका खेळाडूने युवराज सिंगला एका ओव्हरमध्ये पाच षटकार मारले होते.
भारतीय टीम आणि व्यवस्थापनाला ही गोष्ट अधिक खटकली होती. त्यावेळी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू फिलिन्टॉप यांचा युवराच सिंग सोबत शाब्दीक वाद झाला. त्याच्या पुढच्या ओव्हरमध्ये ब्रॉडच्या गोलंदाजीवरती युवराज सिंगने सहा षटकार लगावले.
ज्यावेळी विश्वचषकाचे सामने सुरु होते, त्यावेळी युवराजला सहा षटकार मारल्यानंतर ललित मोदी एक आश्वासन दिलं होतं. त्यांच्या दुसऱ्या दिवशी युवराज सिंगने सहा षटकार लगावले. त्यामुळे ललित मोदींनी युवराज सिंगला एक महागडी कार गिफ्ट दिली होती.
जयपूरमध्ये युवराज सिंगचे वडील यांच्याकडे ललित मोदी यांनी कार देखील एका कार्यक्रमात सुपूर्द केली होती.