नवी दिल्ली : टीम इंडियाची (IND) सेमीफायनलच्या आगोदर विश्वचषक स्पर्धेच (T20 World Cup 2022) चांगली कामगिरी राहिली आहे. सेमीफायनलमध्ये पोहोचल्यानंतर इंग्लंडविरुद्ध (ENG) टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव झाला. कारण कालच्या मॅचमध्ये टीम इंडियाकडून अनेक चुका झाल्या आहेत. तसेच फलंदाजांनी चांगली खेळी केली नाही. त्याचा फटका टीम इंडियाला बसला आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात फायनल मॅच होणार आहे. विशेष म्हणजे कालची मॅच संपल्यानंतर चाहत्यांना धोनीची आठवण झाली आहे.
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टीम इंडियाला T20 विश्वचषक जिंकून दिला आहे. धोनीची यशस्वी कर्णधार म्हणून ओळख आहे. ज्यावेळी महेंद्रसिंग धोनी कर्णधार होता, त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती टीम इंडियावर आली होती. 130 धावा असताना सुद्धा धोनीने आपल्या चातुर्य बुद्धीने टीम इंडियाला विश्वचषक जिंकून दिला होता.
त्यावेळी मैदानात असताना धोनीने खेळाडूंना एका सल्ला दिला होता. “वरती पाहू नका, देव तुम्हाला वाचवायला येणार नाही. तुम्हाला स्वत:ला मैदानात चांगला खेळ करायचा आहे. आणि ती वेळ आता आली आहे. आपण एक नंबर होतो आणि आहोत. काहीही करुन आपल्याला मॅच जिंकायची आहे.”
महेंद्रसिंग धोनी कर्णधार असताना ज्यावेळी टीमचा पराभव व्हायचा. त्यावेळी त्याची जबाबदारी महेंद्रसिंग धोनी स्वत:च्या अंगावर घेत होता. तसेच टीम जिंकल्यानंतर त्याचं श्रेय खेळाडूंना देत होता. त्याचं कारण असं होतं की मी टीमचं नेतृत्व करतो. त्यामुळे चुकीचं काही जरी झालं, तरी त्याची जबाबदारी माझी आहे असं धोनीचं मतं होतं.
धोनीने टीम इंडियाला दोन विश्वचषक जिंकून दिले आहेत. त्यामुळे कालची मॅच पाहिल्यानंतर आजोबांपासून नातवापर्यंत सर्व फॅन्स का म्हणतायत आता महेंद्र सिंह धोनी असायला हवा होता.