India vs Pakistan | मँचेस्टर (इंग्लंड) : भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांचा विश्वचषकातील सामना आज रविवार 16 जून रोजी होत आहे. इंग्लंडमधील मँचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात (old trafford stadium) हा सामना होणार आहे. अवघ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण बाजी मारणार याचीच चर्चा जगभरात सुरु आहे. मात्र या सामन्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे अनेक क्रिकेट रसिकांचा हिरमोड होऊ शकतो. मात्र जर आजच्या सामनादरम्यान पाऊस पडला, तर टीम इंडियावर याचा काय परिणाम होईल याचा ‘टीव्ही 9 मराठी‘ने आढावा घेतला.
भारतीय संघ सध्या 5 गुणांसह 10 संघांच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. विश्वचषकाच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने 5 सामन्यातील 4 सामन्यात विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंड आणि इंग्लंड या दोघांनी प्रत्येकी 3 सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे हे दोन्ही संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विश्वचषकाची गुणतालिका
यंदाच्या विश्वचषकात सर्व संघ प्रत्येक 9 सामने खेळणार आहेत. यात सामन्यात विजयी संघाला प्रत्येकी 2 गुण दिले जातात. तर पावसामुळे किंवा इतर कारणात्सव सामना रद्द झाल्यास दोन्ही टीमला प्रत्येकी 1 गुण मिळतो. यानुसार 6 सामन्यात विजयी होणाऱ्या संघांना थेट उपांत्य फेरीचे तिकीट दिले जाते.
त्या दृष्टीने विचार केला तर, भारताकडे आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत. त्यात दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना हरवून झोकात सुरुवात केली आहे. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला. त्यामुळे भारतीय संघ सध्या 5 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जर भारताचा आणखी एक सामना पावसामुळे रद्द झाला, तर भारताला 1 गुण मिळेल आणि भारताची गुणसंख्या 6 होईल.
भारताची थेट उपांत्य फेरीत धडक
तसेच आजच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला तर भारताला 2 गुण मिळतील. या गुणांच्या मदतीने भारतीय संघाच्या गुणतालिकेत एकूण 7 गुण होतील. त्याशिवाय भारत पाकिस्ताननंतर भारताचा सामना बांग्लादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसोबत होणार आहे. हे तिन्ही सामना जिंकणे भारतासाठी सहज शक्य आहे. त्यामुळे भारत पुढच्या एक किंवा दोन सामन्यात उपांत्य फेरीत धडक मारेल.
पाकिस्तानसाठी मात्र कठीण परिस्थिती
दुसरीकडे पाकिस्तानने विश्वचषकात चार सामने खेळले आहेत. त्यापैकी केवळ एका सामन्यात विजय झाला आहे तर दोन सामन्यात पराभव झाला. एक सामना रद्द झाला. त्यामुळे पाकिस्तानच्या केवळ 3 गुण आहेत आणि गुणतालिकेत पाकिस्तानचा क्रमांक नव्व्या स्थानावर आहे. दरम्यान जर आज होणार सामना रद्द झाला तर, पाकिस्तानच्या खात्यात 1 गुण जमा होईल. यामुळे त्यांचे एकूण 4 गुण होतील. त्यामुळे जर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठायची असेल, तर त्यांना पुढील सर्व सामने जिंकणे गरजेचे आहे.
दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीची टीम इंडिया विश्वचषकातील आपला विक्रम कायम ठेवणार की सरफराज अहमदची पाकिस्तानी टीम बाजी मारणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या
World Cup : भारत-पाकिस्तान सामनाही पावसात वाहून जाणार?
जबरा पाकिस्तानी फॅन, ज्याला धोनी 8 वर्षांपासून तिकीट पाठवतो!
India vs Pakistan : मोहम्मद आमीरवर हल्ला चढवा, सचिनचा विराट-रोहितला सल्ला
भारत-पाक सामना, एका तिकिटाची किंमत तब्बल 60 हजारांच्याही पुढे