T20 World Cup 2022 : रोहित शर्माने टीम इंडियाचे T20 चे कर्णधारपद सोडावे का ? ही आहेत सर्वात मोठी कारणे

| Updated on: Nov 18, 2022 | 3:04 PM

रोहित शर्माचं वय वाढत चालल्यामुळे त्याच्यावर अनेकजण टीका करीत आहे.

T20 World Cup 2022 : रोहित शर्माने टीम इंडियाचे T20 चे कर्णधारपद सोडावे का ? ही आहेत सर्वात मोठी कारणे
Rohit sharma
Image Credit source: icc twitter
Follow us on

मुंबई : विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) सेमीफायनच्या सामन्यात खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियातील (Team India) खेळाडूंवर चाहत्यांनी सडकून टीका केली होती. विशेष म्हणजे काही क्रिकेटच्या चाहत्यांनी बीसीसीआयला (BCCI) खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तात्काळ बाहेर काढून टाका अशी मागणी केली होती. आजपासून टीम इंडियाची न्यूझिलंडविरुद्ध T20 मालिका सुरु झाली आहे. हार्दीक पांड्याकडे टीम इंडियाचे नेतृत्व देण्यात आले आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.

रोहित शर्मा आता 35 वर्षाचा झाला आहे. तो तीन-चार महिने झाले की, क्रिकेटमधून विश्रांती घेत असतो. त्याच्याकडे टीम इंडियाचं तिन्ही फॉरमॅटमधील कर्णधारपद आहे. त्याचबरोबर आयपीएलमधील मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद सुद्धा आहे. एकाचवेळी इतक्या ठिकाणचं कर्णधारपद सांभाळाणं सोप्प नाही. त्यामुळे टीम इंडियाचं T20 फॉरमॅटमधील कर्णधार पद हार्दीक पांड्याला द्यायला हवं.

रोहित शर्माचं वय वाढत चालल्यामुळे त्याच्यावर अनेकजण टीका करीत आहे. कारण त्याचा फॉर्म आता पुर्वीसारखा राहिलेला नाही. मागच्या 12 टी 20 आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये फक्त एकदाच 50 धावाचा आकडा गाठला आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा सारख्या खेळाडूला अशा पद्धतीचे आकडे शोधत नाहीत. झालेल्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माने फक्त 116 केल्या. त्यामुळे त्याच्या फॉर्मविषयी अनेकांनी शंका उपस्थित केली आहे.

हे सुद्धा वाचा

हार्दीक पांड्या सध्या चांगली खेळी करीत आहे. त्याने विश्वचषक स्पर्धेत सुद्धा चांगली खेळी केली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सेमीफायनल मॅचमध्ये हार्दीक पांड्याने अंतिम ओव्हरमध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. 2024 मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी हार्दीक पांड्याला कर्णधारपद द्यायचा बीसीसीआयचा विचार सुरु आहे. विशेष म्हणजे मागच्या आयपीएलच्या सीजनमध्ये हार्दीक पांड्याने गुजरात टाइटंसला चषक जिंकून दिला आहे.