जगभर कोरोनाची वक्रदृष्टी, पण क्रिकेटसाठी UAE का सुरक्षित? जाणून घ्या, ‘खेल की बात’

| Updated on: May 06, 2021 | 12:25 PM

जगभर कोरोनाची वक्रदृष्टी असताना क्रिकेटसाठी UAE का सुरक्षित आहे, याचा आपण सखोल आढावा घेऊया... (Why UAE is safe for IPL Tournament between Covid 19 Crisis)

जगभर कोरोनाची वक्रदृष्टी, पण क्रिकेटसाठी UAE का सुरक्षित? जाणून घ्या, खेल की बात
जगभर कोरोनाची वक्रदृष्टी असताना क्रिकेटसाठी UAE सुरक्षित आहे...
Follow us on

मुंबई : जगभर कोरोनाने धुमाकूळ घातलाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जगभरातल्या अनेक देशांत लाखो जण कोरोनाने बाधित झाले आहेत तर हजारो जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे होत्याचं नव्हतं झालंय. जगातील सगळ्यात लोकप्रिय असलेली इंडियन प्रिमियर लीगची भारतात सुरु असलेली स्पर्धाही कोरोनामुळे स्थगित करण्यात आली आहे. स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारतात कोरोनाची अतिशय वाईट परिस्थिती होती. पण अशाही वातावरणात आयपीएल स्पर्धा घेण्याचं धाडस बीसीसीआयने दाखवलं. पण अखेर बीसीसीआयला एक पाऊल मागे यायला लागलं. मग 2020 ला देखील कोरोना असताना आयपीएलच्या स्पर्धेचं आयोजन यशस्वीरित्या कसं पार पडलं? दुबईत कोरोना नव्हता का? असे अनेक प्रश्न सध्या क्रिकेट रसिकांना पडले आहेत. जगभर कोरोनाची वक्रदृष्टी असताना क्रिकेटसाठी संयुक्त अरब अमिराती (UAE) का सुरक्षित आहे, याचा आपण सखोल आढावा घेऊया… (Why UAE is safe for IPL Tournament between Covid 19 Crisis)

2020 च्या जानेवारी महिन्यात भारतात कोरोनाची एन्ट्री झाली. जवळपास पहिले सहा महिने कोरोनाने भारतात थैमान घातले. मार्च-एप्रिल-मे मध्ये होणारी आयपीएल स्पर्धा साहजिक पुढे ढकलली गेली. मग बीसीसीआयने आयपीएल 2020 स्पर्धा यूईएमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला आणि आश्चर्य म्हणजे जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना ही स्पर्धा यशस्वीपणे पारही पडली.

UAE क्रिकेटसाठी एवढी सुरक्षित का?

पहिलं कारण म्हणजे जगभरात जरी कोरोनाचा प्रकोप सुरु असला तरी यूएईमध्ये कोरोना आटोक्यात आहे. आतापर्यंत यूएईमध्ये कोरोनाच्या 5 लाख 26 केसेस समोर आल्या आहेत. ज्यातील 5 लाख 6 हजार लोकांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच कोरोनाला यूएईने धाकात ठेवलं आहे.

दुसरं कारण म्हणजे यूएईमधील स्टेडियमचं अंतर एकमेकांपासून कमी आहे. यूईएमध्ये क्रिकेटची तीन महत्त्वाची स्टेडियम आहेत. शेख जायद क्रिकेट स्टेडियम, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम आणि शारजाह क्रिकेट स्टेडियम… ही स्टेडियम अबू धाबी, दुबई आणि शारजाह इथे आहेत. तिन्ही स्टेडियममधलं अंतर एकमेकांपासून फार दूर नाहीय म्हणजेच प्रवासाला अधिक वेळ जात नाही. म्हणूनच जैव सुरक्षित वातावरण टिकवून ठेवण्यासाठी मोलाची मदत होते.

UAE मध्ये दोन वेळा आयपीएलचं यशस्वी आयोजन

यूएईमध्ये दोन वेळा आयपीएलचं यशस्वी आयोजन झालेलं आहे. 2014 च्या आयपीएलच्या सुरुवातीच्या मॅचेस यूएईमध्ये खेळल्या गेल्या. भारतात लोकसभा निवडणुका असल्या कारणाने 2014 ला पहिल्या टप्प्यातील मॅचेसचं आयोजन दुबईत करण्यात आलं होतं.

2020 साली भारतात कोरोनाचा प्रकोप सुरु होता. बीसीसीआयने आयपीएल 2020 स्पर्धा यूईएमध्ये खेळविण्याचा निर्णय घेतला आणि आश्चर्य म्हणजे जगभरात कोरोनाचा कहर सुरु असताना ही स्पर्धा यशस्वीपणे पारही पडली.

(Why UAE is safe for IPL Tournament between Covid 19 Crisis)

हे ही वाचा :

सायली संजीवच्या फोटोवर ऋतुराज गायकवाड फिदा, सायलीनेही लाजत ‘दिल’ दिया

आयपीएल स्थगितीच्या घोषणेनंतर शोएब म्हणतो, ‘मी पहिल्यांदाच BCCI ला सांगितलं होतं…’

आयपीएल स्थगित होताच रियान परागचं ट्विट, नेटकऱ्यांकडून टीकेचा भडीमार, पण ट्विटमध्ये नेमकं काय?