Video : लाईव्ह सामन्यात लहानग्याला वाचवण्यासाठी खेळाडूनं केलं असं, एका चुकीमुळे झालं असतं 2.8 कोटींचं नुकसान

| Updated on: Mar 27, 2023 | 10:21 PM

वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी 20 मालिकेत 1-1 ने बरोबरी झाली आहे. दुसरा सामना वेस्ट इंडिजने गमावला खरा पण कर्णधार रोवमॅन पॉवेल उपस्थितांची मनं जिंकली.

Video : लाईव्ह सामन्यात लहानग्याला वाचवण्यासाठी खेळाडूनं केलं असं, एका चुकीमुळे झालं असतं 2.8 कोटींचं नुकसान
चालू सामन्यात खेळाडूने आपला जीव धोक्यात घालत वाचवला चिमुकल्याचा जीव, पण..... क्रिकेट विश्वात एकच चर्चा
Follow us on

सेंच्युरियन : वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची टी 20 मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजने 3 गडी आणि 3 चेंडू राखून विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 6 गडी आणि 7 चेंडू राखून विजय मिळवला. मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली असून तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने 20 षटकात 5 गडी गमवून 258 धावा केल्या होत्या. तर हे आव्हान दक्षिण आफ्रिकेनं 4 गडी गमवून 18.5 षटकात पूर्ण केलं.भले या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव झाला असेल मात्र कर्णधार रोवमॅन पावेलने क्रीडारसिकांची मनं जिंकली.  दुसऱ्या टी 20 सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर त्याच्या कृतीचं नेटकरी कौतुक करत आहेत.

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान टी 20 सामना सुपरस्पोर्ट पार्कवर खेळला जात होता. दक्षिण आफ्रिकन संघ विजयी लक्ष्याचा पाठलाग करत होता. दक्षिण आफ्रिकेनं विजयी लक्ष्य गाठण्यासाठी पहिल्या चेंडूपासून आक्रमक सुरुवात केली होती. या दरम्यान दक्षिण आफ्रिकन फलंदाजाने सीमारेषेच्या दिशेने चेंडू फटकावला. हा चेंडू अडवण्यासाठी पावेलने धाव घेतली. पण सीमारेषेवर असलेल्या बॉल बॉय समोर आला. त्याचं वय 4 ते 5 वर्षे असावं. त्यामुळे उंच धिप्पाड पावेल त्याला आदळला असता तर निश्चितच दुखापत झाली असती.

लहानगा बॉल पकडण्यासाठी पुढे आला त्याला पाहून पावेलनं स्वत:ला सावरलं. कारण त्या चिमुरड्यावर पडला असता तर त्याला गंभीर दुखापत झाली असती. त्यामुळे बाजूने निघत सीमारेषेवरील जाहीरात बोर्डला आदळला. त्याचबरोबर वेग न सावरल्याने बोर्डच्या मागे गेला. स्वताला अडचणीत टाकत पावेलनं त्या लहानग्याला दुखापत होण्यापासून वाचवलं.

पावेलने या सामन्यात 19 चेंडू खेळत 28 धावा केल्या. यात त्याने दोन षटकार आण दोन चौकार ठोकले. आयपीएलमध्ये पावेल दिल्ली कॅपिटल्स या संघाकडून खेळत आहे. त्याला संघ व्यवस्थापनाने 2.80 कोटी खर्च करून आपल्या संघात सहभागी केलं. त्यामुळे एकही जेतेपद नावावर नसल्याने दिल्लीच्या संघाला पावेलकडून बऱ्याच अपेक्षा आहेत.

दिल्ली कॅपिटल्सचा संघ

टीम दिल्ली कॅपिट्ल्स | डेव्हिड वॉर्नर (कॅप्टन) , पृथ्वी शॉ, रिपल पटेल, रोवमॅन पॉवेल, एनरिक नॉर्खिया, चेतन साकरिया, कमलेश नागरकोटी, सरफराज अहमद, यश धुळ, मिचेल मार्श, ललित यादव, अक्षर पटेल, खलील अहमद, लुंगी एन्गिडी, अमन खान, कुलदीप यादव, प्रवीण दुबे, मुस्तिफिजुर रहमान, विकी ओस्तवाल, इशांत शर्मा , फिल साल्ट, मुकेश कुमार, मनीष पांडे आणि राइली रूसो.