IND vs AUS | अनेक खेळाडू ऑऊट ऑफ फॉर्म, तरीही निवड, कोहलीचा निर्णय महागात पडणार?

| Updated on: Dec 16, 2020 | 7:15 PM

बुधवारी 16 डिसेंबरला ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या 11 खेळाडूंची घोषणा करण्यात आली.

IND vs AUS | अनेक खेळाडू ऑऊट ऑफ फॉर्म, तरीही निवड, कोहलीचा निर्णय महागात पडणार?
Follow us on

अ‌ॅडिलेड : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India Tour Australia 2020) यांच्यात उद्यापासून (17 डिसेंबर) कसोटी मालिका खेळण्यात येणार आहे. या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना अ‌ॅडिलेडमध्ये खेळण्यात येणार आहे. हा डे-नाईट सामना असणार आहे. विशेष म्हणजे या सामन्यात पिंक (गुलाबी) चेंडूचा वापर करण्यात येणार आहे. या पहिल्या सामन्यासाठी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाच्या अंतिम 11 खेळाडूंची नावं जाहीर केली. या निवड करण्यात आलेल्या प्लेइंग इलेव्हनवरुन अनेक क्रिकेट समिक्षकांनी तसेच चाहत्यांनी आक्षेप घेतला आहे. पहिल्या कसोटीत काही खेळाडूंना संधी देण्यात आली. हा निर्णय टीम इंडियाला महागात पडेल, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. Will Virat Kohli’s decision to give out-of-form players a chance in the first Test against Australia cost Team India dear

पृथ्वीला वारंवार संधी का?

संघात मुंबईकर पृथ्वी शॉ याला संधी देण्यात आली आहे. त्यामुळे पृथ्वीच्या निवडीवरुन प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पृथ्वीला गेल्या काही काळापासून चमकदार कामगिरी करता आलेली नाही. तसेच पृथ्वीला ऑस्ट्रेलिया ए विरोधातील 2 सराव सामन्यातही विशेष काही करता आले नाही. या दोनही सामन्यात त्याची 40 ही सर्वोच्च धावसंख्या होती. पृथ्वीने आतापर्यंत टीम इंडियासाठी 4 कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. या 4 कसोटीत त्याने 335 धावा केल्या. पृथ्वीची मागील ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र दुखापतीमुळे त्याला खेळता आले नाही.

या वर्षाच्या म्हणजेच 2020 ला टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर गेली होती. या दौऱ्यात टीम इंडिया न्यूझीलंडविरोधात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. या मालिकेत पृथ्वीला सलामी करण्याची संधी मिळाली. मात्र पृथ्वी या मालिकेतही अपयशी ठरला होता. त्याने एकूण 2 सामन्यातील 4 डावात 98 धावाच केल्या. अशा ढिसाळ कामगिरीनंतरही शुभमन गिलला वगळून आऊट फॉर्म असलेल्या शॉला संधी का दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आर आश्विनला संधी का?

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना हा डे-नाईट असणार आहे. डे-नाईट कसोटी सामन्यात फिरकीपटूंपेक्षा वेगवान गोलंदाज प्रभावी ठरले आहेत. आतापर्यंत एकूण 15 डे-नाईट कसोटी सामने खेळण्यात आले आहेत. यामध्ये वेगवान गोलंदाजांनी 26. 76 च्या सरासरीने 101 विकेट्स घेतल्या आहेत. म्हणजेच वेगवान गोलंदाजांनी दर 27 धावांनंतर विकेट्स मिळवले आहेत. तर त्याच तुलनेत फिरकीपटुंनी 50 धावानंतर विकेट मिळवली आहे. यामुळे आश्विनला संधी का देण्यात आली, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

आश्विनऐवजी संघात वेगवान गोलंदाज नवदीप सैनी किंवा मोहम्मद सिराज यांना संधी देता आली असती. या दोन्ही गोलंदाजांमध्ये वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. इशांत शर्मा संघात नसल्याने टीम इंडियाची गोलंदाजी थोड्या प्रमाणात कमजोर ठरतेय.

हनुमा विहारी-पृथ्वी शॉ

आश्विनला आशिया खंडाबाहेर फिरकीने फारशी जादू करता आलेली नाही. आश्विनने आतापर्यंत ऑस्ट्रेलियाविरोधातील 7 कसोटीत 27 विकेट्स घेतल्या आहेत. 105 धावा देऊन 4 विकेट्स ही आश्विनची ऑस्ट्रेलियामधील सर्वोच्च कामगिरी आहे. अ‌ॅडिलेडमधील खेळपट्टी ही फिरकीपटूंसाठी अनुकूल नाही. मात्र ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने 8 डे-नाईट टेस्टमध्ये 18 विकेट्स घेतल्या आहेत. मात्र लायनचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाच्या इतर कोणत्याही फिरकीपटूला आपली छाप सोडता आली नाही.

टीम इंडियाकडे हनुमा विहारी आणि पृथ्वी शॉ सारखे पार्ट टाईम फिरकीपटू आहेत. यामुळे या दोघांनी आश्विनची उणीव भरुन काढली असती. टीम इंडियाकडे पर्याय असतानाही आश्विनला संधी दिल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.

पहिल्या कसोटीसाठी आऊट ऑफ फॉर्म असलेल्या खेळाडूंची निवड करण्यात आल्याने तसेच परिस्थिती विरोधात घेतलेला निर्णय टीम इंडियाला पहिला सामन्यात महागात पडू शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया : मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), आर. अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, आणि जसप्रीत बुमराह

संबंधित बातम्या : 

IND Vs AUS : कर्णधार विराट कोहलीला विश्वविक्रमाची संधी

PHOTO | ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामन्यात विजय मिळवून देणारे टीम इंडियाचे स्टार खेळाडू

Ind Vs Aus : अजिंक्य स्वत:ला कर्णधार म्हणून सिद्ध करेल, मराठमोळ्या रहाणेवर विराटला विश्वास

Ind vs Aus: ‘या’ दोन खेळाडूंमुळे कर्णधार विराट कोहलीच्या अडचणीत वाढ

Will Virat Kohli’s decision to give out-of-form players a chance in the first Test against Australia cost Team India dear