यंदाचा विश्वचषक सैनिकांसाठी जिंकून आणू : विराट कोहली

| Updated on: May 21, 2019 | 4:34 PM

मुंबई : इंग्लंडमध्ये होत असलेला विश्वचषक आपल्या सैनिकांसाठी जिंकून आणू, असा विश्वास टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलाय. विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट कोहली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. हा विश्वचषक माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक असेल, असंही विराट म्हणाला. 30 मेपासून विश्वचषकाची सुरुवात […]

यंदाचा विश्वचषक सैनिकांसाठी जिंकून आणू : विराट कोहली
Follow us on

मुंबई : इंग्लंडमध्ये होत असलेला विश्वचषक आपल्या सैनिकांसाठी जिंकून आणू, असा विश्वास टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केलाय. विश्वचषकासाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट कोहली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरं दिली. हा विश्वचषक माझ्यासाठी सर्वात आव्हानात्मक असेल, असंही विराट म्हणाला.

30 मेपासून विश्वचषकाची सुरुवात होत आहे. विराट कोहलीचा हा तिसरा विश्वचषक असला तरी कर्णधार म्हणून तो पहिल्यांदाच जबाबदारी सांभाळणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक नक्कीच आव्हानात्मक असेल, असं तो म्हणाला. या विश्वचषकात मोठ्या धावसंख्या होण्याचा अंदाजही व्यक्त केला. शिवाय चौथ्या क्रमांकावर कुणाला उतरवायचं यावरही कोहलीने भाष्य केलं.

सध्याच्या भारतीय संघ अत्यंत संतुलित असल्याचं रवी शास्त्री म्हणाले. आपण जीव ओतून खेळलो तर विश्वचषक आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या विश्वचषकात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळाडूंना एकत्र येण्यासाठी वेळ मिळणार आहे. तुम्ही कुठूनही प्रेरणा घेऊ शकता. उदाहरणार्थ तुम्ही भारतीय सैन्याबद्दल बोला, तुम्हाला प्रेरणा मिळते. आम्ही सैन्यासाठी काही करु शकलो तर आम्हाला आनंद आहे. विश्वचषकात आम्ही एकाच संघाविषयी विचार करु शकत नाही. आमची तीव्रता आम्हाला संपूर्ण विश्वचषक होईपर्यंत जपून ठेवायची आहे. आमच्या पातळीवर आम्ही परिपूर्ण असू, प्रतिस्पर्धी संघाविषयी विचार करणार नाही, असं विराट म्हणाला.

भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, अनुभवी महेंद्रसिंह धोनी, शिखर धवन यांसारख्या फलंदाजांचा समावेश आहे. शिवाय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि केदार जाधवही संघात आहेत. विशेष म्हणजे जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांच्यासारखे गोलंदाज जमेची बाजू असतील. रवींद्र जाडेजा, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव हे फॉर्मात असणारे गोलंदाजही जमेची बाजू ठरतील. आयपीएलमध्ये सर्वच खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे.

30 मे रोजी भारताचा दक्षिण आफ्रिकेसोबत या विश्वचषकातला पहिला सामना होईल. पण त्यापूर्वी 25 मे रोजी न्यूझीलंड आणि 28 मे रोजी बांगलादेशविरुद्ध सराव सामना होणार आहे. या सामन्यातूनच उभय संघांना खेळपट्टीचा अंदाज घेता येईल.