आशिया चषक (Asia Cup 2022) कोण जिंकणार हे शेवटपर्यंत गुलदस्त्यात होतं. कारण आशिया चषकात प्रत्येक क्रिकेट टीम चांगली खेळ करीत होती. त्यामुळे यंदाच्या आशिया चषकात चाहत्यांना अधिक मज्जा आली. पाकिस्तानच्या (Pakistan)गोलंदाजांनी यावेळी चांगली गोलंदाजी केली. त्याचबरोबर श्रीलंका (Shrilanka) टीमने उत्कृष्ट प्रदर्शन केलं. त्यामुळे श्रीलंका सहाव्यांदा आशिया चषकाची मानकरी ठरली.
Just stop trolling Asif Ali and Shadab Khan. We should back our team and support them. Winning or losing is part of game.#shadabkhan pic.twitter.com/FbXjLAHxF7
हे सुद्धा वाचा— Sharjeel Khan Alizai (@kon_hu_mai) September 12, 2022
आशिया चषकात सुरुवातीला फलंदाजी करीत असताना श्रीलंका संघाची अवस्था अत्यंत वाईट होती. कारण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्यामुळे श्रीलंकेचे फलंदाज पटपट बाद झाले. एकवेळ श्रीलंका टीम 100 धावा सुद्धा करणार नाही अशी स्थिती होती.
पाकिस्तान खेळाडूंनी गचाळ फिल्डींग केल्यामुळे श्रीलंका फलदाजांनी फटकेबाजी करायला सुरुवात केली. अनेक कॅच पाकिस्तान खेळाडूंनी सोडले. त्यामुळे श्रीलंका टीमची धावसंख्या १७० झाली. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी सुद्धा आपलं चांगलं प्रदर्शन केल्यामुळे त्यांना सहज विजय मिळविता आला.
ज्यावेळी असिफची आणि शादाबची टक्कर झाली, आसिफच्या हाताला चार टाके पडले होते. त्यामुळे त्याला फलंदाजी करता आली नाही. तसेच टक्कर झाल्यानंतर शादाब पुर्णपणे गोंधळून गेला. त्याच्या सुद्धा हाताला दोन टाके पडले होते आणि त्यांच्या कानातून रक्त येत होते असं कारण पाकिस्तानच्या प्रशिक्षकांनी सांगितलं.