मुंबई : वुमन्स प्रिमियर लीग सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या स्पर्धेतील पहिला सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायन्ट्स यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. या स्पर्धेत एकूण 5 संघ असून एकूण 22 सामने खेळले जाणार आहेत. तर अंतिम सामना 26 मार्च 2023 रोजी ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळला जाईल. बीसीसीआयने या स्पर्धेचं आयोजन मुंबई आणि नवी मुंबईतल्या मैदानात केलं आहे. पाच टीम साखळी फेरीत एकमेकांशी दोनदा भिडणार आहे. म्हणजेच एक संघ अंतिम फेरीपूर्वी 8 सामने खेळणार आहे. साखळी फेरीत एकूण 20 सामने होतील. त्यापैकी टॉपला असलेला संघ थेट अंतिम फेरीत जाईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमाकांवरील संघाची अंतिम फेरीसाठी लढत होईल.
वुमन्स प्रिमियर लीगचे सामने संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होतील. मात्र ज्या दिवशी दोन सामने असतील. त्या दिवशी एक सामना दुपारी 3.30 वाजता सुरु होईल. वुमन्स प्रिमियर लीगमध्ये चार डबल हेडर सामने आहेत.
आयपीएलप्रमाणेच वुमन्स प्रीमियर लीगमध्ये चार विदेशी खेळाडूंना खेळण्याची परवानगी असेल. पण संघात असोसिएट खेळाडू असेल तर मात्र पाचव्या खेळाडू खेळू शकतो. दिल्ली कॅपिटल या संघाने असोसिएट संघातील खेळाडू लिलावात घेतला आहे. तारा नोरिस असं युएसएच्या खेळाडूचं नाव आहे.
मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मैथ्यूज, क्लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्ट आणि जिंतामनी कलिटा.
आरसीबी टीम | स्मृति मंधाना (कर्णधार), दिशा कसट, ऋचा घोष, इंदिरा रॉय, एलिस पेरी, सोफी डिवाइन, हेदर नाइट, एरिन बर्न्स, डाने वेन निकर्क, श्रेयंका पाटील, पूनम खेमनर, आशा शोबाना, कनिका अहूजा, रेणुका सिंह ठाकूर, प्रीति बोस, कोमल जैनजद, सहाना पवार आणि मेगन सुचित.
दिल्ली कॅपिट्ल्स टीम | मेग लॅनिंग (कॅप्टन), जेमिमाह रोड्रिग्स (उपकर्णधार), शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजॅन कप्प, तीतस साधु, एलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणि, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासन, स्नेहा दीप्ती आणि अरुंधति रेड्डी.
गुजरात जायंट्स टीम | बेथ मूनी (कॅप्टन), एश्ले गार्डनर,सोफिया डंकली, एनाबेल सदरलँड, हरलीन देओल, डिएंड्रा डॉटिन, स्नेह राणा, सब्बिनेनी मेघना, जॉर्जिया वारेहम, मानसी जोशी, दयालन हेमलता, मोनिका पटेल, तनुजा कंवर, सुषमा वर्मा, हर्ली गाला, अश्विनी कुमारी, परुनिका सिसोदिया आणि शबनम शकील.
यूपी वॉरियर्स टीम | एलिसा हीली (कर्णधार), दीप्ति शर्मा, सोफी एकलेस्टन, ताहिला मॅक्ग्रा, देविका वैद्य, शबनम इस्माइल, ग्रेस हॅरिस, अंजली शर्वनी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सहरावत, किरन नवगिरा, लॉरेन बेल, पार्शवी चोपडा, एस यशसरी, लक्ष्मी यादव आणि सिमरन शेख.
अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी पाच संघ भिडणार आहेत. पण 20 सामन्यानंतर तीन संघांचे सारखेच गुण असतील. तर मात्र रनरेटवर गुणांकन केलं जाईल. ज्या संघाचा रनरेट चांगला आहे तो संघ थेट अंतिम फेरीत जाईल. तर उर्वरित दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ अंतिम फेरीत जाण्यासाठी लढत करेल. अंतिम फेरीचा सामना अनिर्णित ठरला तर सुपर ओव्हर केली जाईल. पण सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित ठरला तर जिंकेपर्यंत सुपर ओव्हर खेळली जाईल.
प्रत्येक संघाला दोन डीआरएस रिव्ह्यू घेता येईल. रिव्ह्यूनंतर अल्ट्राएज आणि हॉवके तंत्रज्ञान तिसऱ्या पंचांसाठी उपलब्ध असेल. त्या आधारे निर्णय दिला जाईल.