मुंबई : आयसीसी वुमन्स टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यात तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलियाचं पारडं जड आहे.वर्ल्डकप 2022 च्या अंतिम फेरीतही ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाचं पाणी पाजलं होतं. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 4-1 ने पराभव केला होता. पण भारताची वर्ल्डकपमधील कामगिरी पाहता ऑस्ट्रेलियाला सहज हरवण्यासाठी कंबर कसली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघानं विजयाची खात्री दिली आहे. विकेटकीपर बॅटर रिचा घोषणं हायव्होल्टेज सामन्यापूर्वी संघाची रणनिती काय असेल याबाबत स्पष्ट सांगितलं आहे. 180 धावांचं टार्गेट ऑस्ट्रेलियाला पुरेसं असल्याचं मत तिने व्यक्त केलं आहे.
“ऑस्ट्रेलियन संघ रन्स चेस करण्यात पटाईत आहे. कारण त्यांच्याकडे तळापर्यंतचे खेळाडू चांगली फलंदाजी करतात. आम्हीही चांगल्या प्रकारे चेस करू शकतो. पण नाणेफेक कुणाच्याही हातात नाही. त्यामुळे जे काही स्थिती आहे ती आम्ही चांगल्या प्रकारे हाताळू यात शंका नाही. यासाठी आम्ही खास प्लान तयार केला आहे.”, असं रिचा घोषनं पत्रकार परिषदेत सांगितलं.
“खेळपट्टी कशी हे मला माहिती नाही पण आम्ही तयार आहोत. आम्ही त्यांना 180 धावांचं टार्गेट देण्यासाठी प्रयत्न करू. गोलंदाजीत आम्ही त्यांना 140-150 धावांवर रोखू. कारण त्यांच्याकडे चांगला बॅटिंग लाइनअप आहे.”, अशी रणनिती रिचा घोष हिनं सांगितलं.
टी 20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 4 गडी गमवून 184 धावा केल्या आणि विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना भारतीय महिला संघ 99 या धावसंख्येवर बाद झाला. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न भंगलं होतं.
भारतीय संघ- हार्लीन देओल, जेमिह रॉड्रिग्स, सब्बिनेनी मेघना, शफाली वर्मा, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, स्नेह राणा, रिचा घोष, यास्तिका भाटिया, अंजली सरवानी, मेघना सिंग, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग, शिखा पांडे
ऑस्ट्रेलियन संघ- बेथ मूने, ग्रेस हॅरिस, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅनाबेल सुथरलँड, अशले गार्डनर, इलिस पेरी, हिथर ग्रॅहम, जेस जोनस्सेन, किम गार्थ, तहिला मॅग्राथ, अलिसा हीली, अलाना किंग, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वारेहम, मेगन स्कूट