महिला आशिया चषकाला (Women’s Asia Cup) आजपासून सुरुवात होत आहे. हा आशिया चषक बांग्लादेशमध्ये (Bangladesh) खेळवला जाणार आहे. आज आशिया चषकातील पहिली मॅच टीम इंडियाविरुद्ध श्रीलंका (Shrilanka) अशी होणार आहे. दुपारी एक वाजता सामन्याला सुरुवात होईल. विशेष म्हणजे आशिया चषकात सात टीम खेळणार असून प्रत्येक मॅचमध्ये संघर्ष पाहायला मिळणार आहे.
आत्तापर्यंत महिला टीमने सहावेळा आशिया चषक जिंकला आहे. यंदाचा आशिया चषक सुद्धा टीम इंडिया जिंकेल असा दावा अनेक माजी खेळाडूंनी केला आहे. कारण नुकत्याच झालेल्या स्पर्धेत टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकली. विशेष म्हणजे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला एकही सामना जिंकू दिला नाही.
सगळ्या टीमनी आत्तापर्यंत चांगला सराव केला आहे. टीम इंडियामध्ये चांगले खेळाडू असल्यामुळे आणि चांगली कामगिरी करीत असल्यामुळे टीम इंडिया आशिया कप जिंकेल असा विश्वास आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, एस मेघना, स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, किरण नवगिरे.
चमारी अथापथु (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (डब्ल्यूके), कौशिनी नुथ्यांगा, ओशाधी रणसिंघे, मलशा शेहानी, मधुशिका मेत्थानंद, इनोका रणवीरा, रश्मी सिल्वा, सुधिगन कुमारी, सुधिका कुमारी, कौशिनी. कुलगीना कुमारी, थारिका शेवंडी