मुंबई : आयसीसी महिला टी-20 वर्ल्ड कपमधील भारताचा पहिला सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघासोबत होणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच 12 फेब्रुवारीला हा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. महिला भारताची महिला मॅचविनर खेळाडू स्मृती मंधानाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पहिल्या सामन्यामध्ये स्मृतीच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. इतकंच नाहीतर तिच्या वर्ल्डकप खेळण्यावरही संभ्रम आहे.
स्मृती मंधाना भारतीय महिला संघाची उपकर्णधार आहे. भारताच्या फलंदाजीमधील एक महत्त्वाची खेळाडू असून तिने अनेक सामने एकहाती जिंकून दिले आहेत. टी-20 वर्ल्ड कपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये तिच्या हाताला दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. आता माहिती समोर आली आहे की, स्मृती मंधाना वर्ल्ड कप बाहेर नाही पण पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. मात्र अद्याप याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
स्मृती मंधाना सराव सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीला आली मात्र ती अवघे तीन चेंडू खेळली. तर दुसऱ्या सराव सामन्यामध्ये ती खेळू शकली नव्हती. गेल्या आठवड्यामध्ये तिरंगी मालिकेमधील फायनल सामन्यामध्ये कर्णधार हरमनप्रीत कौरच्याही खांद्याला दुखापत झाली होती. भारतीय संघासाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यामध्ये स्मृती मंधाना खेळणार की नाही याबाबत क्रीडा चाहत्यांना मोठा प्रश्न पडला आहे.
महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेला आजपासून सुरूवात होणार असून दक्षिण आफ्रिकेमध्ये यंदाचा वर्ल्डकप सुरू आहे. पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेचा केपटाऊनमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये एकूण 10 संघांचा समावेश असून दोन गट तयार करण्यात आले आहेत. 10 संघांमध्ये एकूण 23 सामने होणार आहेत.
यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मैदानावर महिला पंच आणि सामना अधिकाऱ्यांची जबाबदारी पार पाडणार आहेत. आताच झालेल्या अंडर 19 महिला वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने अंतिम सामन्यामध्ये बाजी मारली होती. भारताचा पहिला सामना 12 फेब्रुवारी पाकिस्तान, दुसरा सामना 18 फेब्रुवारी वेस्ट इंडिजसोबत होणार आहे. गतवर्षीच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव करत ऑस्ट्रेलिया संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतंं.
वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (C), स्मृती मानधना, शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमाह रॉड्रिग्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवाणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, राजेश्वरी गायकवाड.