लंडन : विश्वचषकात भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज सामना होत आहे. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने आजच्या सामन्यात दोन बदल केले आहेत. मोहम्मद शमी आणि युजवेंद्र चहल यांना विश्रांती देण्यात आली असून, त्यांच्याऐवजी रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवला संधी देण्यात आली. केदार जाधवला या सामन्यातूनही वगळण्यात आलं आहे. बांगलादेशविरुद्ध संघात स्थान मिळालेल्या दिनेश कार्तिकला पुन्हा संधी देण्यात आली आहे.
भारत नंबर एकचं स्थान पटकावण्यासाठी लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात उतरत आहे. भारताने सेमीफायनलमध्ये आधीच धडक मारली आहे. भारत सध्या गुणतालिकेत दुसऱ्या नंबरवर आहे. मात्र श्रीलंकेला हरवून आज अव्वलस्थानी पोहोचण्याचा भारताचा इरादा आहे. असं असलं तरी भारताला अव्वलस्थानी पोहोचण्यासाठी सध्या पहिल्या नंबरवर असलेल्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागणार आहे.
दरम्यान, भारताचा या विश्वचषकात केवळ एक पराभव झाला आहे. भारताने 6 विजय मिळवले असले, तरी सेमीफायनलच्या तोंडावर भारताला मधल्या फळीची चिंता सतावत आहे. केदार जाधव, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पंड्या यांच्यावर मधल्या फळीची जबाबदारी आहे. मात्र धोनी आणि केदार जाधवने आतापर्यंत निराशा केली आहे. त्यामुळे केदार जाधवला बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात बाहेर बसावं लागलं.
ICC World Cup 2019 : मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळले, आता बुमराहबद्दल मलिंगा म्हणतो….
टीम इंडियाला मीडल ऑर्डरची चिंता सतावत आहे. विजय शंकरला दुखापतीमुळे माघारी धाडून त्याजागी मयांक अग्रवालला संघात घेतल्यानं कदाचित आजच्या सामन्यात सलामीला मयांक अग्रवाल आणि रोहित शर्मा उतरवण्याची शक्यता आहे. तर, केएल राहुलला मीडल ऑर्डर म्हणजे चौथ्या क्रमांकावर उतरण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेचे वनडे वर्ल्डकपमधील आव्हान भले संपुष्टात आले असेल. मात्र आपला स्पर्धेचा समारोप भारतावर विजय मिळवूनच करू, असे आत्मविश्वासाने परिपूर्ण उद्गार काढले आहेत ते या संघाचा ऑफस्पिनर धनंजय डीसिल्वानं. मुळात स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आल्यानं श्रीलंकेकडे गमावण्यासारखं काहीच नाही. पण, या सामन्यात जर भारत हरला तर भारताची लढत इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाशी होणार आहे. वर्ल्डकपच्या सामन्यात इंग्लंडनं भारतावर 31 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे नक्कीच हा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
चौथ्या नंबरशी लढत
भारत श्रीलंकेविरुद्धचा सामना जिंकला तर, भारत 15 अंकांसोबत गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचेल आणि भारताची लढत चौथ्या नंबरवरील संघाशी होणार. पण, यासाठीही आणखी एक अडथळा असणार तो म्हणजे सध्या गुणतालिकेत नंबर एकला असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ. शनिवारी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचा होणाऱ्या सामन्यात जर दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाला हरवलं तर, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी जाईल आणि भारताची थेट लढत चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाशी होईल.
विश्वचषकातील गुणतालिका
देश | विजय | गुण |
ऑस्ट्रेलिया | 7 | 14 |
भारत | 6 | 13 |
इंग्लंड | 6 | 12 |
न्यूझीलंड | 5 | 11 |
संबंधित बातम्या
ICC World Cup 2019 : मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळले, आता बुमराहबद्दल मलिंगा म्हणतो….
भारताची चिंता वाढली, सेमीफायनलपूर्वी विराटवर कारवाईची शक्यता
पाकिस्तानचा पत्ता कट, भारताचा सेमीफायनल इंग्लंड किंवा न्यूझीलंडविरुद्ध