मुंबई : वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील सातवा टप्पा सुरु आहे. सातव्या टप्प्यात दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सामना पार पडला. हा सामना दक्षिण अफ्रिकेने 190 धावांनी जिंकला आहे. त्यामुळे गुणतालिकेवर जबरदस्त प्रभाव पडला आहे. न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकत दक्षिण अफ्रिकेला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. पण हा निर्णय चुकीचा ठरला असंच म्हणावं लागेल. दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढलं. रस्सी व्हॅन दर डुसेन आणि क्विंटन डी कॉक यांनी शतकी खेळी केल्या. रस्सीने 118 चेंडूत 133 धावा, तर क्विंटनने 116 चेंडूत 114 धावा केल्या. त्याचबरोबर डेविड मिलरने 30 चेंडूत 53 धावा केल्या. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 358 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण न्यूझीलंडचा संघ सर्वबाद 167 धावा करू शकला. त्यामुळे न्यूझीलंडचा नेट रनरेटमध्ये मोठा फरक पडला आहे. पाचव्या टप्प्यात पहिल्या स्थानावर असलेला न्यूझीलंडचा संघ आता चौथ्या स्थानावर गेला आहे. टॉप 4 मध्ये स्थान टिकवणं आता मोठं आव्हान आहे. तर पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या आशा वाढल्या आहेत.
दक्षिण अफ्रिकेने 12 गुण आणि +2.290 नेट रनरेटसह पहिलं स्थान गाठलं आहे. तर भारत 12 गुण आमइ +1.405 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर ऑस्ट्रेलिया 8 गुणांसह तिसऱ्या आणि न्यूझीलंड 8 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड पराभूत झाल्यान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानला उपांत्य फेरीची संधी वाढली आहे. न्यूझीलंडने आणखी एक सामना गमवला तर पाकिस्तानला संधी मिळू शकते. पण नेट रनरेटही तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे.
संघ | सामने | विजय | पराभव | गुण | नेट रनरेट |
---|---|---|---|---|---|
भारत | 7 | 7 | 0 | 14 | +2.102 |
दक्षिण अफ्रिका | 7 | 6 | 1 | 12 | +2.290 |
ऑस्ट्रेलिया | 7 | 5 | 2 | 10 | +0.924 |
न्यूझीलंड | 8 | 4 | 4 | 8 | +0.398 |
पाकिस्तान | 8 | 4 | 4 | 8 | +0.036 |
अफगाणिस्तान | 7 | 4 | 3 | 8 | -0.330 |
श्रीलंका | 7 | 2 | 5 | 4 | -1.162 |
नेदरलँड्स | 7 | 2 | 5 | 4 | -1.398 |
बांगलादेश | 7 | 1 | 6 | 2 | -1.446 |
इंग्लंड | 7 | 1 | 6 | 2 | -1.504 |
बांगलादेश आणि इंग्लंडचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं आहे. तर नेदरलँड आणि श्रीलंकेच्या आशा जर तर वर अवलंबून आहेत. पाकिस्तानचंही तसंच भगवान भरोसे आहे. या तिन्ही संघांचा एक पराभव होताच स्पर्धेती आव्हान संपुष्टात येणार आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने उर्वरित सामन्यात पराभवाची धूळ चाखली, तर मात्र संधी मिळू शकते. त्यामुळे अजूनही उम्मीद पे दुनिया कायम है असं म्हणायला हरकत नाही.
भारताचा सातवा सामना श्रीलंकेशी 2 नोव्हेंबरला होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना रंगणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांचं हे होम पिच आहे. त्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच आशा आहेत. टीम इंडियाचं तसं पाहिलं तर उपांत्य फेरीत निश्चित झालं आहे. पण उद्या त्यावर शिक्कामोर्तब होईल.