World Cup Final : बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनची माफी मागितली

| Updated on: Jul 15, 2019 | 12:16 PM

इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे 84 धावांची खेळी करणार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स. सामनावीर ठरलेल्या स्टोक्सने जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडचा विजय खेचून आणला.

World Cup Final : बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनची माफी मागितली
Follow us on

लंडन : आयसीसी विश्वचषकाच्या थरारक फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना दोनवेळा टाय झाला. त्यामुळे इंग्लंडला चौकारांच्या संख्येवरुन विजयी घोषित करण्यात आलं. न्यूझीलंड कमनशिबी ठरला. सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचूनही न्यूझीलंडला विजय मिळवता आला नाही. तर क्रिकेट कारकिर्दीत इंग्लंड पहिल्यांदाच विश्वविजेता ठरला.

इंग्लंडच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे 84 धावांची खेळी करणार न्यूझीलंडमध्ये जन्मलेला इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स. सामनावीर ठरलेल्या स्टोक्सने जबरदस्त कामगिरी करत इंग्लंडचा विजय खेचून आणला. त्याच्या खेळीमुळेच इंग्लंडचा संघ सुपरओव्हरपर्यंत पोहोचू शकला. सुपर ओव्हरमध्येही सामना टाय झाल्याने सर्वाधिक चौकारांच्या नियमानुसार इंग्लंडला विजेते घोषित करण्यात आलं.

ICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर   

या सामन्यानंतर स्टोक्स म्हणाला, “खूपच चांगली खेळी झाली. मला आता काय बोलावं हेच सुचत नाही. काही तासात आम्ही मेहनत घेतली आणि ती प्रत्यक्षात उतरवली. त्यामुळेच हा सामना इतका रोमांचक झाला. पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार”

सर्वांचे आभार मानल्यानंतर स्टोक्सने मॅचदरम्यान खेळपट्टीवार काय संवाद सुरु होता याबाबतही सांगितलं. खेळपट्टीवार जोस बटलरशी सतत संवाद सुरु होता, असं तो म्हणाला.

“या सामन्यात टिकून राहण्यासाठी मी आणि जोस बटलर सतत संवाद साधत होतो. रन रेट जास्त दूर नाही, हेच आम्ही एकमेकांना समजवत होतो” असं स्टोक्स म्हणाला.

या सामन्यानंतर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनची माफी मागितली.

हा सामना संपल्यानंतर सर्वाधिक चर्चा मार्टिन गप्टिलने मारलेल्या ओव्हर थ्रोची झाली. शेवटच्या षटकात गप्टिलने मारलेला थ्रो बेन स्टोक्सच्या बॅटला लागून सीमारेषेबाहेर गेल्याने, चार अतिरिक्त धावा इंग्लंडला मिळाल्या. त्यामुळेच न्यूझीलंड पिछाडीवर पडला. या सामन्यानंतर बेन स्टोक्सने न्यूझीलंडचा कर्णधार विल्यमसनची माफी मागितली. त्या प्रकाराबद्दल (ओव्हर थ्रो) मी केन विल्यमसनची माफी मागतो, असं स्टोक्स म्हणाला.

संबंधित बातम्या 

ICC Rules : सर्वाधिक चौकार ठोकणारा विजेता, मग सर्वाधिक विकेट्स घेणारा विजेता का नाही: शाहिद कपूर   

धोनीला ‘रन आऊट’करणारा गप्टीलही धावबाद, फॅन्स म्हणाले ‘करावे तसे भरावे’   

ENG vs NZ : सामना टाय आणि सुपर ओव्हरही टाय, मग इंग्लंडचा विजय कसा?   

ENGvsNZ: विश्वविजेता टाय! सुपर ओव्हरचा थरार!! इंग्लंड जगज्जेता!!!   

World Cup 2019 संपला, मात्र सचिन तेंडुलकरचा विक्रम कुणालाही मोडता आला नाही