मुंबई : गुजरात जायन्ट्स विरुद्ध युवी वॉरियर्स या सामन्यात महाराष्ट्री किरण नवगिरेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पहिल्याच सामन्यात तिने 43 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या खेळीत 5 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. तिची ही खेळी पाहून क्रीडाप्रेमींमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. गुजरात जायन्ट्सनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 षटकात 6 गडी 169 धावा केल्या आणि विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान युपी वॉरियर्सनं 19.5 षटकं आणि 7 गडी गमवून पूर्ण केलं. हा सामना युपी वॉरियर्स जिंकला खरा पण किरण नवगिरेच्या बॅटनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. महाराष्ट्राच्या सोलापुरात जन्मलेली किरण वुमन्स प्रीमियर लीगमध्ये युपी वॉरियर्सकडून खेळत आहे. लिलावात फ्रेंचाइसीने तिला बेस प्राइस 30 लाख रुपयात संघात समील केलं होतं.
गुजरातनं विजयासाठी दिलेल्या 170 धावांचा पाठलाग करताना तीन विकेट अवघ्या 20 धावांवरच तंबूत परतले. त्यामुळे गुजरातची सामन्यावरील पकड मजबूत झाली होती. त्यानंतर किरणने एक बाजू सावरली आणि दीप्ती शर्मासोबत 66 धावांची भागीदारी केली. यात दीप्तीच्या फक्त 11 धावा होत्या. तिने अर्धशतकी खेळी केल्यानंतर जेव्हा बॅट उंचावली तेव्हा त्या बॅटच्या मागच्या बाजूला MSD07 असं लिहिलं होतं. याच बॅटने तिने गुजरातच्या गोलंदाजांना आस्मान दाखवलं.
You have done something Great When ur parents are cheering & happy in home!!! #KiranNavgire | #WPL pic.twitter.com/3SPD5JQiFA
— ash (@ashMSDIAN7) March 5, 2023
Parents of Kiran Navgire watching match on Phone. #MsDhoni #UPWvsGG #GraceHarris #WomensIPL #UPWarriorz #GujaratGiants pic.twitter.com/PwtoEYMr3H
— ADITYA RAJPUT (@adityar4jput) March 5, 2023
"I follow Dhoni sir and I love finishing like him" – Kiran Navgire ?@MSDhoni #WPL2023 #WhistlePodu pic.twitter.com/HNTPaKtt8D
— DHONI Era™ ? (@TheDhoniEra) March 6, 2023
सामन्यानंतर किरणने सांगितलं की, “जेव्हा मी षटकार मारते तेव्हा मला खूप बरं वाटतं. जेव्हा मी नेट प्रॅक्टीस करते तेव्हा षटकार मारण्याचा सराव करते. मी महेंद्रसिंग धोनीला फॉलो करते. मी त्याच्याप्रमाणे फिनिशिंग करून लांब षटकार मारणं पसंत करते.” यापूर्वी महिला टी20 चॅलेंजर्स ट्रॉफीत खेळताना वेलोसिटीसाठी सर्वात जलद अर्धशतक झळकावलं होतं. किरण नवगिरे भारतासाठी 6 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहे. देशांतर्गत सीनिअर महिला टी20 स्पर्धेथ नागालँडकडून खेळताने तिने 162 धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. टी 20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला आणि पुरुषांच्या तुलनेत ही सर्वात मोठी खेळी आहे.
गुजरात जायन्ट्सची प्लेईंग 11 : सब्भिनेनी मेघना, सोफीया डंकले, हर्लीन देओल, अनाबेल सुथरलँड, सुष्मा वर्मा, अशले गार्डनर, दयालन हेमलथा, स्नेह राणा (कर्णधार), किम गार्थ, तनुजा कनवार, मानसी जोशी
युपी वॉरियर्सची प्लेईंग 11 : अलिसा हिली (कर्णधार), श्वेता सेहरावत, किरण नवगिरे, तहिला मॅकग्राथ, दीप्ती शर्मा, ग्रेस हरिस, सिमरन शेख, देविका वैद्य, सोफी एक्सलस्टोन, अंजली सरवानी, राजेश्वरी गायकवाड