WPL 2023 : सामना सुरु होताच मुंबई इंडियन्सनं केला गणपती बाप्पाचा गजर, म्हणाले “पहिला सामना…”

| Updated on: Mar 06, 2023 | 11:30 AM

वुमन्स प्रिमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायन्ट्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.

WPL 2023 : सामना सुरु होताच मुंबई इंडियन्सनं केला गणपती बाप्पाचा गजर, म्हणाले पहिला सामना...
वुमन्स प्रिमियर लीगमध्ये मुंबई विरुद्ध गुजरात सामना, कोण मारणार बाजी?
Image Credit source: WPL Twitter
Follow us on

मुंबई – वुमन्स प्रिमियर लीग 2023 स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायन्स यांच्यात सुरु आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिलाच सामना सुरु झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचं ट्वीट चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सला पहिला धक्का यास्तिका भाटियाच्या रुपानं लागला. अवघी एक धाव करून ती तंबूत परतली. त्यानंतर हेले मॅथ्यु आणि नॅट क्विवर ब्रंट या जोडीने बाजी सावरली. दुसऱ्या विकेटसाठी दोघांनी 50 धावांची भागीदारी केली. यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यास मदत होणार आहे.हिली मॅथ्यु 31 चेंडूत 47 धावा करून बाद झाली. तिला अॅशले गार्डनरनं त्रिफळाचीत केलं. तिने तीन चौकार आणि 4 षटकार ठोकले. तिच्या पाठोपाठ नॅट क्विवर ब्रंटही 18 चेंडूत 23 धावा करून बाद झाली. तिने आपल्या खेळीत एकूण 5 चौकार मारले.

मुंबई इंडियन्सनं गणपती बाप्पा मोरया असं म्हणत गणरायाला साकडं घातलं आहे. आता सामना संपल्यावर कोण बाजी मारतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. “गणपती बाप्पा मोरया…पहिली मॅच आमच्या मुलींना जिंकू द्या”, असं ट्वीट मुंबई इंडियन्सनं केलं आहे.

मुंबईचे पुढचे सामने

  • 6 मार्च MI vs RCB संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबोर्न स्टेडियम
  • 9 मार्च DC vs MI संध्याकाळी 7:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम
  • 12 मार्च UPW vs MI संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबोर्न स्टेडियम
  • 14 मार्च MI vs GG संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबोर्न स्टेडियम
  • 18 मार्च MI vs UPW दुपारी 3:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम
  • 21 मार्च RCB vs MI दुपारी 3:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स महिला संघ – यास्तिका भाटिया, हेले मॅथ्यु, नॅट क्विवर ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकार, इसी वाँग, हुमैरा काझी, अमैला केर, अमनजोत कौर, जिंतीमनी कालिता, सायका इशाक

गुजरात जायंट्स महिला संघ – बेथ मूनी, सब्बीनेनी मेघना, हर्लीन देओल, अॅशले गार्डनर, अनाबेल सुथरलँड, दयालन हेमलथा, जॉर्जिया वारेहम, स्नेह राणा, तनुजा कनवार, मानसी जोशी, मोनिका पटेल