मुंबई : वुमन्स प्रीमियम लीग 2023 स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघाने साखळी फेरीत 8 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे 12 असे समान गुण होते. मात्र रनरेटच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत स्थान मिळालं. तर मुंबई इंडियन्सला अंतिम फेरीत जाण्यासाठी युपी वॉरियर्स लढावं लागणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध युपी वॉरियर्स यांच्या 24 मार्च 2023 रोजी सामना होणार आहे. पण साखळी फेरीत या दोन्ही संघाची काय स्थिती होती? कोण कोणावर वरचढ होतं? जाणून घ्या
साखळी फेरीत मुंबई इंडियन्स आणि युपी वॉरियर्स दोनदा आमनेसामने आले. पहिल्या सामन्यात युपी वॉरियर्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. 20 षटकात 6 गडी गमवून 159 धावा केल्या आणि विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं. मुंबई हे आव्हान 17.3 षटकात 2 गडी गमवून पूर्ण केलं.
दुसऱ्या सामन्यात युपी वॉरियर्सने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात मुंबईला 20 षटकात सर्वबाद 127 धावाच करता आल्या आणि विजयासाठी 128 धावांचं आव्हान दिलं. मुंबईच्या गोलंदाजांनी युपीला विजयासाठी चांगलं झुंजवलं. शेवटच्या षटकापर्यंत हा सामना रंगला. पण हा सामना युपीने 5 गडी आणि 3 चेंडू राखून जिंकला.
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात तसं पाहिलं तर मुंबई इंडियन्सचं पारडं जड आहे. पण युपी वॉरियर्सनेही शेवटच्या टप्प्यात चांगलं कमबॅक केलं आहे. युपीकडून तहिला मॅकग्राथ जबरदस्त फलंदाजी करत आहे. तिने आठ सामन्यात 59 च्या सरासरीने 295 धावा केल्या आहेत. तसेच सोफी एक्सलस्टोनं ही साखळी फेरीतील सर्वात बेस्ट गोलंदाज राहिली आहे. तिने 8 सामन्यात 6.22 सरासरीने धावा देत 14 गडी बाद केले आहेत.
मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी अटॅक चांगला आहे. एमिलिया कर, साईका इशाक आणि हिली मॅथ्यूज जबरदस्त गोलंदाजी केली आहे. त्यामुळे छोटी धावसंख्या रोखण्यात मुंबईचा संघ वरचढ आहे.
मुंबई इंडियन्स टीम | हरमनप्रीत कौर (कॅप्टन) नेट सीवर, एमिलिया कर, पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, हीथर ग्राहम, इसाबेल वोंग, अमनजोत कौर, दारा गुजराल, साईका इशाक, हेली मॅथ्यूज, क्लोए ट्रायोन, हुमाएरा काजी, प्रियंका बाला, सोनम यादव, नीलम बिश्ट आणि जिंतामनी कलिटा.
यूपी वॉरियर्स टीम | एलिसा हीली (कर्णधार), दीप्ति शर्मा, सोफी एकलेस्टन, ताहिला मॅक्ग्रा, देविका वैद्य, शबनम इस्माइल, ग्रेस हॅरिस, अंजली शर्वनी, राजेश्वरी गायकवाड, श्वेता सहरावत, किरन नवगिरा, लॉरेन बेल, पार्शवी चोपडा, एस यशसरी, लक्ष्मी यादव आणि सिमरन शेख.