Marathi News Sports Wtc final 2021 indian bowler r ashwin can most wicket instead pat cummins
वेगवान गोलंदाजांपुढे दाखवावी लागणार फिरकीची जादू, अश्विनजवळ WTC फायनलमध्ये ‘जायंट किलर’ बनण्याची संधी!
भारताचा रविचंद्रन अश्विन सध्या WTC स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने 13 कसोटी सामन्यात 67 बळी घेतले आहेत. (WTC Final 2021 Indian bowler R Ashwin can Most Wicket instead Pat Cummins)
1 / 6
भारताचा धुरंधर ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होण्याची सुवर्णसंधी आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो हा रेकॉर्ड करु शकतो. यासाठी त्याला वेगवान गोलंदाजांपुढे फिरकीची कमाल दाखवावी लागणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड अश्विनच्या पुढे आहे. पण ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दोन्ही संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून आऊट झालेले आहेत. त्यामुळे अश्विनला सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वलस्थानी येण्याची संधी आहे.
2 / 6
या स्पर्धेत आतापर्यंत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने सर्वाधिक 70 बळी मिळवले आहेत. कमिन्सने 14 कसोटी सामन्यात 70 विकेट घेतल्या आहेत. त्याने 21.02 च्या सरासरीने तर 47.6 स्ट्राइक रेटने या विकेट्स मिळवल्या आहेत. या स्पर्धेतील सामन्यादरम्यान 28 धावा देऊन 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
3 / 6
इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसर्या स्थानावर आहे. ब्रॉडने 17 कसोटींमध्ये 69 विकेट्स घेतल्या आहेत. 31 धावा देऊन 06 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
4 / 6
भारताचा रविचंद्रन अश्विन सध्या सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने 13 कसोटी सामन्यात 67 बळी घेतले आहेत. त्याची विकेट घेण्याची सरासरी 20.88 तर स्ट्राइक रेट 46.9 इतका आहे. 145 धावा देऊन 07 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची अंतिम सामना 18 जूनपासून सुरु होईल. तेव्हा अश्विनच्या मनात टीम इंडियाच्या विजयासह पॅट कमिन्सलाचा रेकॉर्ड मोडित काढण्याची स्वप्न असतील. पण, प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला स्थान मिळते की नाही यावर हे सर्व अवलंबून आहे.
5 / 6
चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लिऑनचे नाव आहे. त्याने 14 कसोटींमध्ये 31.37 च्या सरासरीने आणि 67.5 च्या स्ट्राइक रेटने 56 विकेट्स घेतल्या आहेत. परंतु जर ऑस्ट्रेलियन संघाने अंतिम फेरी गाठली नाहीय. त्यामुळे त्याला विकेट्समध्ये भर टाकता येणार नाही.
6 / 6
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊथी हा स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेण्याऱ्या गोलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याला जर सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये अव्वल स्थानी पोहोचायचं असेल तर भारतीय संघाच्या दोन्ही डावांत सगळ्या विकेट्स त्याला घ्याव्या लागतील. सध्या 10 मॅचमध्ये त्याने 51 विकेट्स घेतल्यात. अव्वस स्थानी यायला त्याला आणखी 20 विकेट्सची गरज आहे.